घरताज्या घडामोडीLive Update: जोगेश्वरी ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजर उघडकीस; २५ ऑक्सिजन सिलेंडर, १२ ऑक्सिजन...

Live Update: जोगेश्वरी ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजर उघडकीस; २५ ऑक्सिजन सिलेंडर, १२ ऑक्सिजन किट पोलिसांनी केले जप्त

Subscribe

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथे पोलिसांनी छापेमारी करून २५ ऑक्सिजन सिलेंडर, १२ ऑक्सिजन किट आणि इतर साहित्य जप्त केले आणि आरोपींना अटक केली.

- Advertisement -

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील नाईट कर्फ्यूचा वाढण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत हा नाईट कर्फ्यू असणार आहे.

- Advertisement -

मुंबईत २४ तासांत १ हजार ४१६ कोरोनाबाधित आढळले तर १ हजार ७६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.


कर्नाटकच्या सरकारने म्युकरमायकोसिस रुग्णासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांना सरकारी रुग्णालयात मोफत उपचार देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.


आसाराम बापूला झटका; राज्यस्थान हायकोर्टाने अंतरिम जामीन याचिका फेटाळली

आसाराम बापूने आयुर्वेदिक उपचारकरता हरिद्वारला जाण्यासाठी याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने एम्स मेडिकलच्या रिपोर्टच्या आधारे अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.


गोव्यातील प्रशासनाने तोक्ते चक्रीवादळात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी ४ लाखांची मदत केली आहे. किरकोळ जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.


दिल्लीत गेल्या २४ तासांत ३ हजार ९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७ हजार २८८ जण बरे होऊन घरी गेले आहे. दिल्लीतील आता कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख १२ हजार ९५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २२ हजार ८३१ जणांचा मृत्यू झाला असून १३ लाख ५४ हजार ४४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्फ्यू 31 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे


तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोवा न्यायालयाकडून दिलासा. बलात्काराच्या आरोपांतून तरुण तेजपाल यांनी निर्दोष मुक्तता


वादळानंतर नुकसानग्रस्त भागात दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार – मुख्यमंत्री

तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, असं म्हणत नुकसानग्रस्त भागातील जनतेला एकप्रकारे मदतीचं आश्वासनच दिलं आहे. यासह येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाणार असल्याचाही त्यांनी शब्द दिला.


गेल्या दिवसभरात देशात २ लाख ५९ हजार ५९१ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ४ हजार २०९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. तर दिलासादायक म्हणजे गेल्या २४ तासात ३ लाख ५७ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.


गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सी-६० पोलीस पथकाने १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकित आठ ते दहा नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. या कारवाईमुळं गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात ही घटना घडली. गडचिरोली पोलिसांचे सी-६० च्या कमांडो जवान या भागात नक्षल विरोधी अभियान राबवत होते.


barge P-305 दुर्घटना: कॅप्टन राकेश बल्लाव, मुख्य अभियंता रहमान शेख यांच्यासह इतर काही जणांविरोधात मुंबई पोलिसांकडून एफआयआर दाखल.

P-305 बार्ज कॅप्टन व इतरांविरूद्ध यलोगेट पोलिस ठाण्यात गुन्हा 304 (2), 338, 34 आयपीसी नोंदविला आहे.


दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज तिसावी पुण्यतिथी.


तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर


यवतमाळमध्ये RTI कार्यकर्त्याला विवस्त्र करत केली मारहाण केली. चंदन हातगाडे असे या RTI कार्यकर्त्याचे नाव आहे. गुरूवारी सायंकाळी त्याला ७ ते ८ व्यक्तीनी पांढरकवडा रोडवर विवस्त्र मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्यावर अॅट्रोसिटी सह अनेक गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहे. ८ पैकी ३ आरोपींना पोलिसांनी केली अटक इतर ५ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. चंदन हातगाडे हा RTI कार्यकर्ता असून रेती व्यवसायिकांनी खंडणी मगितल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची पोलिसांची माहिती आहे.


रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहे. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावाही घेणार आहेत

मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे

  • सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
  • ०८.४० वा. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
  • सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व
    मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण
  • सकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  • सकाळी १०.२५ वाजता मोटारीने मालवण येथे आगमन व “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  • सकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  • या पहाणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
  • चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण
  • दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रवास

गोंदिया जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ आढळला मृतावस्थेत बिबट्या

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या तिरोडा तालुक्यातील सिल्ली येथील जंगल परीसरात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. ही घटना समोर आल्यानंतर वन्यजीवप्रेमीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील बिबट्याची शिकार होत असल्याचा आरोप होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -