घरदेश-विदेशRajya Sabha Election : राज्यसभेच्या १५ जागांसाठी तीन राज्यांत आज निवडणूक

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १५ जागांसाठी तीन राज्यांत आज निवडणूक

Subscribe

राज्यसभेसाठी समाजवादी पार्टीने तीन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यात जया बच्चन, निवृत्त आयएएस अधिकारी आलोक रंजन आणि माजी खासदार रामजी लाल सुमन यांचा समावेश आहे

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 56 जागांपैकी 41 जागांवर निवडणूक बिनविरोध जाली आहे. यामुळे आज 15 जागांसाठी तीन राज्यात मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश 10 जागा, हिमाचल प्रदेश 1 जागा, आणि कर्नाटक 4 जागांसाठी आज मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेशात 10 राज्यसभेच्या जागांसाठी एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात भाजपा 8 आणि समाजवादी पक्षाचे 3 उमदेवारमध्ये निवडणूक होणार आहे. तसेच उत्तर प्रदेशात विधासभेच्या एकूण 403 सदस्य आहेत. यात 397 आमदार आहेत. समाजवाद पार्टी आणि भाजपा दोन्ही पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग करत आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता

राज्यसभेसाठी समाजवादी पार्टीने तीन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यात जया बच्चन, निवृत्त आयएएस अधिकारी आलोक रंजन आणि माजी खासदार रामजी लाल सुमन यांचा समावेश आहे. समाजवादीचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. पण समाजवादी पार्टीला खरी कसरत ही तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी करावी लागणार आहे. राज्यसभेसाठी समाजवादी पार्टीने तीन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यात जया बच्चन, निवृत्त आयएएस अधिकारी आलोक रंजन आणि माजी खासदार रामजी लाल सुमन यांचा समावेश आहे. समाजवादीचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. पण समाजवादी पार्टीला खरी कसरत ही तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला 37 प्रथम पसंतीची मते आवश्यक असतात. यात किमान 10 आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.

हेही वाचा – Paytm Payments Bank : पेटीएम बँकेचे चेअरमन विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; नवीन कार्यकारी मंडळ येणार

- Advertisement -

कर्नाटकात काँग्रेसचे सर्व आमदारांना हॉटेल

कर्नाटकात चार जागांपैकी फक्त एक जागा मिळवण्याची क्षमता असतानाही भाजपा-जेडी (एस) युतीने त्यांचा दुसरा उमेदवार कुपेंद्र रेड्डी आणि भाजपा नारायण बंडगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधीच काँग्रेसने सर्व आमदारांना हॉटेलमध्ये पाठविले आहे. काँग्रेसकडून सय्यद हुसेन, जीसी चंद्रशेखर आणि अजय माकन निवडूक लढवित आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे 134, भाजपा 66 आणि जेडीएस 19 आणि अपक्ष 4 आमदार आहे. अपक्ष चार आमदारांपैकी दोन आमदारांचे काँग्रेस समर्थन आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -