घरदेश-विदेशRam Mandir : ...तोपर्यंत PMO अयोध्येतून चालेल, ठाकरे गटाचा भाजपाला टोला

Ram Mandir : …तोपर्यंत PMO अयोध्येतून चालेल, ठाकरे गटाचा भाजपाला टोला

Subscribe

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावरून ठाकरे गट आणि भाजपात शब्दरण रंगले आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सहभागी होणार आहेत. सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तथापि, 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा राम मंदिराच्या नावावर राजकारण करत असल्याचे आरोप ठाकरे गटाने केला आहे. ही निवडणूक होईपर्यंत पंतप्रधान कार्यालय (PMO) अयोध्येतूनच चालवले जाईल, असे वाटत असल्याची टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – BJP : ‘या’ सगळ्यावर उतारा म्हणून राममंदिराचा उद्घाटन सोहळा…, संजय राऊतांचे भाजपावर टीकास्त्र

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणूक होईपर्यंत पंतप्रधान कार्यालय अयोध्येतून चालवले जाईल… सरकारही तेथून चालवले जाईल… ते प्रभू रामाच्या नावावरच मते मागतील, सांगायला त्यांचे काम आहेच कुठे? कधी पुलवामा, कधी राम.., अशी टीका खासदार राऊत म्हणाले.

- Advertisement -

राम भक्त आम्ही देखील आहोत. आम्ही आणि आमच्या पक्षाने राम मंदिरासाठी रक्त सांडले आहे, त्याग केला आहे, बलिदान दिले आहे; पण अशा प्रकारचे राजकारण देशात यापूर्वी कधी झाले नाही आणि होणारही नाही… आपण पाच हजार वर्षे मागे जाऊन देश चालवत आहोत, अशी तीखट टिप्पणी त्यांनी केली.

हेही वाचा – Narayan Rane : मोर नाचतो म्‍हणून…; राम मंदिर मुद्द्यावरून नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा

राम मंदिराचा सोहळा हा देशवासीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. पण सध्या राम मंदिराचा सोहळा फक्त भाजपाचा झाला आहे, तो देशाचा व्हायला हवा. हा फक्त धार्मिक सोहळा नसून देशाचा सांस्कृतिक सोहळा आहे, मात्र भाजपाने त्याला राजकीय सोहळा करून टाकला. स्वतःच्या घरातील मुंज, लग्नाचे निमंत्रण देतात, तशा पद्धतीने भाजपाचे लोक निमंत्रण देत आहेत. जणू काय राम मंदिराचे यांनी मंगल कार्यालय करून ठेवले आहे. प्रभू श्रीराम सर्व पाहत आहेत. राम मंदिरासाठी असंख्य शिवसेनेने त्याग केलेला आहे. त्याला आम्हाला आता कोणतेही गालबोट लावायचे नाही. पण योग्यवेळी आम्ही बोलू, असा इशाराही खासदार राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा – Ram Mandir : काँग्रेसचे नेते अयोध्येत गेल्यास भावना दुखावतील? मुस्लीम संघटनेने दिले उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -