घरक्राइमCrime News : हत्येच्या प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी 31 वर्षांनी ठोकल्या फिल्मी...

Crime News : हत्येच्या प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी 31 वर्षांनी ठोकल्या फिल्मी स्टाईलने बेड्या

Subscribe

मुंबई : देशभरात मुंबई पोलिसांची ख्याती आहे. मुंबई पोलीस हे त्यांचे काम नेहमीच चोख पद्धतीने त्यांचे काम पार पाडत असतात म्हणून त्यांचे कायमच कौतुकही करण्यात येत असते. पण आता तर मुंबई पोलिसांनी गेल्या 31 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. हत्येच्या प्रकरणात फरार असलेला दीपक भिसे हा तब्बल 31 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सध्या या आरोपीचे वय हे 62 वर्ष आहे. त्याला पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने या आरोपीचा गेल्या अनेक वर्षांपासून शोध सुरू ठेवला होता. (Crime News: fugitive accused in murder case was chained by Mumbai police after 31 years in a film style)

हेही वाचा… Waluj MIDC Fire : छ. संभाजीनगरातील हँडग्लव्ह कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 1989 मध्ये राजू चिकना याच्या हत्येच्या प्रकरणात आणि धर्मेंद्र सरोज याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दीपक भिसेला अटक करण्यात आली होती. परंतु, या प्रकरणात त्याला 1992 मध्ये जामीन मिळाला होता. त्यानंतर हा आरोपी या खटल्याच्या सुनावणीसाठी कधीही न्यायालयात आला नाही. ज्यानंतर 2003 मध्ये न्यायालयाकडून भिसेला फरार घोषित करण्यात आले. पोलिसांकडून त्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला, पंरतु, तो काही पोलिसांना सापडला नाही.

याबाबत माहिती देत एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीपक भिसे हा कांदिवली येथील तुळसकरवाडी येथे वास्तव्यास होता. त्यामुळे पोलीस जेव्हा कधी त्या ठिकाणी त्याचा शोध घेण्याकरिता जात होते. त्याठिकाणी तो अनेक वर्ष आले नसल्याचे तेथील स्थानिकांकडून सांगण्यात येत होते. तर भिसे आता जिवंत असेल पण की नाही, असेही लोकांकडून सांगण्यात यायचे. परंतु, एकदा तपासादरम्यान पोलिसांना, भिसेच्या बायकोचा फोन नंबर सापडला. त्यानंतर तो नालासोपारा येथे असल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 29 डिसेंबर) रात्री छापा टाकून भिसे याला ताब्यात घेतले. भिसे हा नालासोपाऱ्यातच आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाला होता. इतकेच नाही तर तो झाडे तोडण्याचे देखील कॉन्ट्रॅक्ट घेत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -