घरदेश-विदेशRBI Governor : रेपो रेट, रिव्हर्स रेटमध्ये बदल नाही - शक्तिकांत दास

RBI Governor : रेपो रेट, रिव्हर्स रेटमध्ये बदल नाही – शक्तिकांत दास

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेत असून यांनी रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलास मिळाला आहे. पुढे शक्तिकांत दास म्हणाले की, रेपो रेट हा ४ टक्केच राहणार आहे. २०२० पहिल्या ६ महिन्यात आर्थिक घसरण झाली असून या काळात जगभरातील उत्पादन तसेच सेवा क्षेत्राला जबर फटका बसला आहे. दरम्यान, एप्रिलच्या तुलनेत आता आर्थिक व्यवस्था हळूहळू सुधारत आहे. कोरोना काळात जगभरात आयातीवर परिणाम झाला आहे. भारतात महागाईचा दर वाढताच राहिला आहे. देशात यंदा चांगला पाऊस पडत असून यावरही शक्तिकांत दास यांनी समाधान व्यक्त केले आहे. चांगल्या पावसामुळे खरिप पेरणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शेती व्यवसायाला बळकटी येणार आहे. तसेच कोरोनावरची लस आल्यास चित्र बदलेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था उणे मध्येच राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या २४ व्या बैठकीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. तीन दिवस चाललेल्या बैठकीतील निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितले. पुढील काळात खाद्यपदार्थांचे दर वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली. यावर्षी जून महिन्यात वार्षिक महागाई दर मार्चच्या तुलनेत वाढून ५.८४ टक्क्यांवरून ६.०९ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मीडिअम टर्म टार्गेटपेक्षा तो अधिक आहे. रिझर्व्ह बँकेचे हे टार्गेट २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान आहे, असेही गव्हर्नर म्हणाले.

हेही वाचा –

धक्कादायक! चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -