घरताज्या घडामोडीपुन्हा डोनाल्ड ट्रम्प: रिपब्लिकन पार्टीने अधिकृत उमेदवार म्हणून केले घोषित

पुन्हा डोनाल्ड ट्रम्प: रिपब्लिकन पार्टीने अधिकृत उमेदवार म्हणून केले घोषित

Subscribe

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीने आपले अधिकृत उमेदवार म्हणून पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांचीच अधिकृत घोषणा केली आहे. तर उपराष्ट्राध्यक्षपदी माईक पेन्स यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता डेमोक्रॅटिक पार्टीचे जो बिडेन आणि रिपब्लिकनचे ट्रम्प असा निवडणुकीचा सामना पाहायला मिळेल. रिपब्लिकनच्या अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, “आपण नक्की जिंकूच. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. आपला देश चुकीच्या किंवा अतिचुकीच्या दिशेने जाणार की नव्या दिशेने जाणार हे ही निवडणूक ठरविणार आहे.”

- Advertisement -

नॉर्थ कॅरोलिनाच्या शार्लेट येथे रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन आज संपन्न होत आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या ३३६ सदस्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होत असताना ट्रम्प यांच्या नावाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी ट्रम्प यांनी चमत्कारीकरित्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजेरी लावून सर्वांना धक्का दिला. अमेरिकन परंपरेनुसार राष्ट्राध्यक्ष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत थांबतात. जेव्हा त्यांच्या नावाची घोषणा शेवटी केली जाते, तेव्हा ते भाषण देतात. पण ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी भाषण दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -