घरताज्या घडामोडीड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कागदपत्रांची वैधता संपली? घाबरू नका, सरकारचा मोठा निर्णय

ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कागदपत्रांची वैधता संपली? घाबरू नका, सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायन्सस आणि वाहन कागदपत्रांची वैधता कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारने यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्यात आहेत.

दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी वाहन कागदपत्रांची वैधता कालावधी वाढवण्याची घोषणा केली. जर या काळात वाहनाचे फिटनेस, परमिट, नोंदणीशी संबंधित कागदपत्रांची वैधता संपली असेल तर ३१ डिसेंबरपर्यंत नुतनीकरण करता येईल. तसेच ड्रायव्हिंग लायन्ससचा कालावधी कालबाह्य होत असेल तर तोही ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येऊ शकतो.

- Advertisement -

मास्क न घालता एकटे कार चालवताय तर सावध….

तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकटे गाडी चालवाताना जर मास्क घातला नसाल तर ५०० रुपये दंड दिल्ली पोलीस आकारत आहेत. यामुळे सध्या दिल्लीचे लोक पोलीस, उपराज्यपाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना याबाबत तक्रार करत आहेत.

राजधानी दिल्लीत कारमध्ये मास्क न घालणार्‍या लोकांकडून दिल्ली पोलीस सतत दंड आकारत आहेत. त्यामुळे लोक सतत दिल्ली प्रशासनाला तक्रार करत आहेत. पण जे लोक तक्रार करत आहेत त्यांना कदाचित हे माहित नाही आहे की, मास्क न घालणे हे सरकारी आदेशांचे उल्लंघन आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या मार्गदर्शक सूचनेत स्पष्ट केले होते की कारमध्ये एकापेक्षा अधिक दोन लोक असू शकतात, परंतु यावेळी सोशल डिस्टन्सिंग राखणे बंधनकारक असेल. तसेच, प्रत्येकाने मास्क घालणे अनिवार्य असेल. रस्ता सामान्यत: सार्वजनिक ठिकाण मानले जाते. त्यामुळे सध्या दिल्ली पोलीस कारमध्ये मास्क न घालणाऱ्या लोकांकडून दंड आकारत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सर्व सामान्यांना दिलासा; ‘या’ जीवनाश्यक वस्तूंवर आता GST कमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -