घरताज्या घडामोडीनवऱ्याला प्रेयसीबरोबर बेडरूममध्ये बघताच पत्नीने केलं असं काही

नवऱ्याला प्रेयसीबरोबर बेडरूममध्ये बघताच पत्नीने केलं असं काही

Subscribe

प्रेमप्रकरणातून हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण पतीच्या प्रेम प्रकरणाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. प्रेयसीच्या प्रेमात वेडा झालेल्या पती या महिलेला त्रास देत होता. त्यामुळे अखेर या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. या विवाहितेने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अश्विनी प्रविण घुग्गुसकर असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांत या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०१६ साली अश्विनीचा प्रवीण घुग्गुसकर याच्याशी विवाह झाला. या दोघांचा सुखाचा संसार सुरू असताना त्यांना एक ३ वर्षाचा मुलगाही आहे. पण त्यानंतर अश्विनीचा छळ सुरू झाला. प्रवीणही तिला रोज मारहाण करू लागला. ‘माझं एका युवतीवर प्रेम आहे, तिच्यासोबतच मला लग्न करायचं आहे. त्यामुळे तू मुलाला घेऊन निघून जा’ अशी धमकी प्रवीण तीला वारंवार देत होता. सगळ्यात धक्कादायक म्हणजे यामध्ये पतीच नाही तर अश्विनीचे सासरे आणि सासूही तिला बेदम मारहाण करायची.

- Advertisement -

थेट प्रेयसीला आणलं घरी

काही दिवसांनी प्रवीणने थेट प्रेयसीला घरी आणलं. अश्विनी समोर असतानाही ते दोघे बेडरूममध्ये एकत्र राहायचे. त्यात पतीची प्रेयसीदेखील तिला धमकी देत होती. त्यामुळे या सगळ्याला कंटाळून अखेर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने विष प्राशन करून आत्महत्या केली.


हे ही वाचा – Sushant Sucide Case: CBI ची लिस्ट तयार, रियाला विचारणार ‘हे’ २४ प्रश्न!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -