घरदेश-विदेशATM मध्ये कॅश नसल्यास बँकांना होणार १० हजारांचा दंड, RBIचा नवा नियम

ATM मध्ये कॅश नसल्यास बँकांना होणार १० हजारांचा दंड, RBIचा नवा नियम

Subscribe

एटीएममध्ये पैसै नसल्याने अनेकदा ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र या त्रासापासून आता ग्राहकांची मुक्ती होणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आदेश जारी करत एटीएममध्ये पैसे नसलेल्या संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असे स्पष्ट केले आहे. १ ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केले.

आरबीआयने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएममध्ये वेळोवेळी पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास बँकांवर १० हजारांची दंडात्मक कारवाई केली जाईल. एटीएममध्ये कॅश उपलब्धतेबाबत आरबीआयने सर्व बँक अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचाकल आणि सीईओंना लक्ष ठेवण्यासाठी सुचना दिल्या आहेत. आरबीआयने नवीन आदेशात म्हटले की, एटीएम मशीनमध्ये कॅश नसल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे बँका, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAO) एटीएममध्ये कॅश उपलब्धतेवर लक्ष ठेवावे तसेच वेळोवेळी कॅश फिल करण्यासाठी त्यांच्या यंत्रणा अधिक सक्षम कराव्यात. एटीएममध्ये किती आहे. याचे योग्य नियोजन करत वेळे मिळताच पुन्हा एटीएममध्ये पैसे टाकावेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही.

- Advertisement -

आरबीआयने यासाठी ‘Scheme of Penalty for non-replenishment of ATMs’ या नियमाची घोषणा केली आहे. या नियमानुसार एटीएममध्ये दहा तासांहून अधिक काळासाठी कॅश नसल्यास हा नियम लागू करण्यात येणार आहे.व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्यूएलए) म्हणजेच प्रायव्हेट एटीएमच्या प्रकरणातही हा दंड आकारला जाईल. असेही आरबीआयने स्पष्ट केलं. बँकांना कॅश संदर्भातील व्यवस्थापन आणि कॅश फिलिंग सिस्टम मजबूत करण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे.


IAS टॉपर टीना डाबी -अतहर आमीर अखेर विभक्त, घटस्फोटाला कोर्टाची मंजुरी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -