घरCORONA UPDATESputnik Light लसीचा सिंगल डोस कोरोनासोबत लढण्यासाठी जास्त सुरक्षित अन् प्रभावी, Lancetचा...

Sputnik Light लसीचा सिंगल डोस कोरोनासोबत लढण्यासाठी जास्त सुरक्षित अन् प्रभावी, Lancetचा अहवाल

Subscribe

स्पुतनिक लाइट ही सिंगल डोस असलेली लस घेतल्यानंतर डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्यास त्यावर ७० टक्के प्रभावी ठरते

भारताकडून आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आलेली रशियाची स्पुतनिक व्ही लसीचे सौम्य रुप असलेली स्पुतनिक लाइट ही सिंगल डोस असलेली लस कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित आणि प्रवाभी प्रतिकारशक्ती देणारी असल्याचे लँन्सेटच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्पुतनिक लाइट लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी अहवालांवरुन हे सिद्ध झाले आहे. ही लस रशियामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना देण्यात आली आहे. भारताने १० ऑक्टोबर रोजी स्पुतनिक लाइट लसीच्या निर्यातीसाठी परवानगी दिली.  रशिया सध्या स्पुतनिक लाइट ही लस ही त्यांची निर्यात होणारी मुख्य लस म्हणून बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. स्पुतनिक लाइट कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रभावी ठरत असल्याने रशिया लवकरच स्पुतनिक लाइट लस त्यांची मुख्य लस म्हणून बाजारात आणू शकते.

लँन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, सेंट पीटर्सबर्ग येथे लस तयार करणाऱ्या गामालेया संस्थेतील शास्त्रज्ञ १८ ते ५९ वयोगटातील ११० स्वयंसेवक जानेवारी २०२१ लसीकरण झालेल्या इम्यून सिस्टम आणि महत्त्वपूर्ण साईड इफेक्ट्सवर लक्ष ठेवत आहेत. गेल्या काही दिवसांच्या अभ्यासांती असे समोर आले की, ही लस कोरोना व्हायरसच्या मूळ प्रकारावर वेगाने प्रभाव टाकत आहे. रशियात सध्या डेल्टा व्हेरिएंटचे नवे रुग्ण समोर येत आहेत. स्पुतनिक लाइट ही सिंगल डोस असलेली लस अल्फा आणि बीटा या व्हेरिएंटवर थोड्या कमी वेगाने काम करत आहे.

- Advertisement -

द लँन्सेट आणि गामालेया मधील सहा हजार आंतरराष्ट्रीय आणि प्लेसबो नियंत्रित फेज ३ मधील ट्रायल चाचण्यांच्या निकषांच्या आधारे स्पुतनिक लाइट लसीला मे महिन्यात क्लिनिकल वापरासाठी मंजूरी देण्यात आली.

त्याचप्रमाणे रशियाने आधी देखील स्पष्ट केले होतो की, स्पुतनिक लाइट ही सिंगल डोस असलेली लस घेतल्यानंतर डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्यास त्यावर ७० टक्के प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे पहिल्यांदा कोरोना संसर्ग होऊन गेल्यानंतर देखील स्पुतनिक लाइट प्रभावी ठकते.

- Advertisement -

हेही वाचा – Covaxin Gets WHO Nod : कोवॅक्सिनला WHOकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -