घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price Drop : केंद्राकडून पेट्रोल-डिझेल दर कपात, काँग्रेसचा भाजपवर खोचक...

Petrol Diesel Price Drop : केंद्राकडून पेट्रोल-डिझेल दर कपात, काँग्रेसचा भाजपवर खोचक निशाणा

Subscribe

देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता त्रासली होती. ऐन सणासुदीच्या काळात मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील एक्साइज ड्यूटी ५ रुपये तर डिझेलवर १० रुपये प्रति लिटर कपात केली आहे. केंद्राने दरात कपात केल्यानंतर काही राज्यांनीही वॅटमध्ये घट करुन नागरिकांना चांगला दिलासा दिला यामुळे त्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलमध्ये १२ आणि १७ रुपयांपर्यंत घट झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे श्रेय काँग्रेसनं स्वतःला घेतलं नाही परंतू निर्णयावरुन केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलमध्ये कर कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चांगला दिलासा मिळाला आहे. याचे श्रेय काँग्रेसनं स्वतःला न घेता देशातील जनतेला दिलं आहे. केंद्र सरकारला करजीवी संबोधून मोदी सरकारला खरेपणाची आठवण करुन दिल्याबद्दल जनतेचे आभारही काँग्रेसनं मानले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या वेळेची किंमतीशी तुलना केली आहे. देशाला जुमला नको तर तुम्ही जी मोठ्या प्रमाणात करवाढ केली आहे ती परत घ्या. यंदाच्या वर्षात मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर २८ रुपये आणि २६ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे पेट्रोलचे दर २८ आणि डिझेलचे दर २६ रुपयांनी कमी करा आणि मग त्यातून ५ आणि १० रुपयांची घट करा तेव्हा सांगा दिवाळीची भेट आहे. असे खडेबोल काँग्रेसकडून मोदी सरकारला सुनावण्यात आले आहेत.

- Advertisement -

दिवाळीनिमित्त देशातील नागरिकांना भेट – भाजप

पेट्रोल, डिझेलच्या दरात केंद्र सरकारने घट केल्यावर भाजपकडून याला देशातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त खास भेट दिली असल्याचे सांगितले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, दरात कपत केल्यामुळे इंधनाचा खप वाढेल आणि यामुळे महागाईसुद्धा कमी होईल. तर गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना फार मोठा दिलासा मिळेल. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे की, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फार महत्त्वाचा निर्णय आहे.


हेही वाचा : मोदी सरकारकडून जनतेला दिवाळीचं गिफ्ट! पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -