घरदेश-विदेशसुदर्शन पटनायक यांचे नवे वाळू शिल्प

सुदर्शन पटनायक यांचे नवे वाळू शिल्प

Subscribe

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओडिसातील सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी समुद्रकिनाऱ्यावर पारंपारिक पद्धतीच्या बोटीच्या आकाराचे शिल्प बनवून त्यावर वेल कम टू ओडिसा, हॉकी मेन्स वर्ल्ड कप २०१८ असे वाळूनेच लिहिले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओडिसातील सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी समुद्रकिनाऱ्यावर पारंपारिक पद्धतीच्या बोटीच्या आकाराचे शिल्प बनवून त्यावर वेल कम टू ओडिसा, हॉकी मेन्स वर्ल्ड कप २०१८ असे वाळूनेच लिहिले आहे. हे शिल्प त्यांनी ओडिसाच्या पुरी येथील पुरी बीचवर बनवले आहे. सोबतच त्यांनी आजच्या खास दिवसाचे निमित्त साधून कार्तिकी पौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. सुदर्शन पटनायक हे जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध शिल्पकार असून त्यांनी आजवर अनेक दिग्गज व्यक्तीमत्वांचे वाळू शिल्प बनवले आहेत.

- Advertisement -

विविध व्यक्तींचे वाळू शिल्प 

सुदर्शन पाटनायक यांनी बनवलेल्या वाळू शिल्पांपैकी वर्ल्ड पिससाठी महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मा की ममता दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची आई, वर्ल्ड एड्स डेच्या निमित्ताने एड्स विरोधातील लढा, मिस वर्ल्ड २०१७ मनुषी छिल्लर, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नातील असे एक ना अनेक शिल्प त्यांनी बनवले आहे. त्यांच्या वाळू शिल्पाची दखल देशविदेशातील दिग्गज मंडळीही घेतात.

वाचा : हॉकी वर्ल्ड कपच्या अॅंथम साँगचे टीजर रिलीज

- Advertisement -

ओडिसात हॉकी वर्ल्ड कप २०१८ 

ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये २८ नोव्हेंबरपासून पुरुष हॉकी विश्व कप २०१८ ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी संगीतकार ए. आर. रेहमान यांनी खास अॅंथन साँगदेखील बनवले आहे. संगीतकार ए. आर. रेहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून यामध्ये बॉलीवूडचा किंग शाहरुह खानदेखील दिसत आहे. साधारण ४६ सेकंदाचा हा व्हिडिओ असून यामध्ये ओडिसाच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते. त्याशिवाय भारतीय हॉकी खेळाडूदेखील गाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -