घरमुंबईदेसी जुगाडाची मोनोरेल ऑन ट्रॅक

देसी जुगाडाची मोनोरेल ऑन ट्रॅक

Subscribe

एमएमआरडीएच्या तंत्रज्ञांचा देसी जुगाड यशस्वी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोनोरेलला पुर्नसंजीवनी देत अखेर मोनोरेल आज रूळावर आणली. एमएमआरडीएच्या कर्मचाऱी आणि अधिकारी यांच्या जुगाडाने सज्ज झालेली मोनोरेल आज रूळावर धावली. मलेशियन मोनोरेल डब्ब्यांसाठी एमएमआरडीएने मेक इन इंडिया करारांतर्गत भारतीय बनावटीचे दुरूस्तीचे पार्ट बसविल्यानंतरची ही पहिलीच मोनोरेल होती. नादुरूस्त मोनोरेलचे सुटटे भाग भारतातील तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करू शकतो हा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आता बळावला आहे.

एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांनीच आणली मोनो रूळावर | MMRDA employees worked hard to bring back monorail track on

एमएमआरडीएच्या मोनोरेल प्रकल्पात गेल्या अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेल्या मोनोरेलच्या ट्रेन अखेर ट्रॅकवर आणण्याची किमया एमएमआरडीएच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यातील अथक परिश्रमानंतर या मोनोरेल ट्रेन रूळावर धावू लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ट्रेन ट्रॅकवर आणण्यासाठी एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. याआधी मोनोरेलचा कंत्राटदार एमएमआरडीएने काळ्या यादीत टाकला होता. त्यामुळे अनेक सुट्या पार्ट्सची चणचण या मोनोरेलच्या देखभाल दुरूस्तीसाठी येत होती.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, December 16, 2020

- Advertisement -

याआधी २०१४ रोजी पहिल्यांदा मोनोरेल धावली. मलेशियन स्कोमी कंपनीबरोबर झालेल्या करारांतर्गत १० मोनोरेल भारतात दाखल होणे अपेक्षित होते़ मात्र १० मोनोरेल भारतात आल्यानंतरही वारंवार नादुरूस्त होत होत्या. त्यातच एक मोनोरेल जळून पूर्ण खाक झाल्यानंतर तब्बल अनेक महिने बंद असणारी मोनो तांत्रिक बिघाडामुळे रखडत चालत होती. अखेरीस देखभाल करणाऱ्या स्कोमी कंपनीचे कंत्राट रदद करीत एमएमआरडीएने मोनोरेलची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनतर मात्र मोनोरेलचा दुसरा टप्पा सूरू करून पूर्ण मोनोरेल मार्गिका सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. एमएमआरडीएने मोनोरेलची धुरा सांभाळल्यानंतर नादुरूस्त मोनोरेल दुरूस्त करण्यासाठी कंबर कसल्यानेच आज भारतीय बनावटीचे सुटटे भाग बनवून मलेशियन मोनोरेल ऑन ट्रॅक असल्याचा निर्वाळा एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर ए राजीव यांनी दिला आहे.

मलेशियन स्कोमी कंपनीने दहा गाडयांचे करार केला होता. मात्र त्यापैकी एक संपूर्ण जळाली तर २ गाडया कधीच दूरूस्त होउू शकत नसल्याने स्क्रॅप करण्यात आल्या़ २ गाडयांच्या दूरूस्तीसाठी सुटटे भाग तयार करून भारतातच बनविण्याचे शिवधनुष्य उचलण्यात आले. उर्वरित ४ गाडया आलटून पालटून सूरू करण्यात आल्या. पण त्यापैकी दोन गाडया वारंवार नादुरूस्त होत असल्याने आणि मलेशियन स्कोमी कंपनीला करारातून हटविल्याने मलेशियन अभियंत्यांनीही मोनोच्या दूरुस्तीकडे दुर्लक्ष केले. या नादुरूस्त गाडयाचे नादुरूस्त भाग भारतीय बनावटीने उभारण्याचा चंग एमएमआरडीएने बांधला़ अखेरीस भारतीय इंजिनियर्स, तंत्रज्ञ, कुशल कामगार यांच्या मदतीने भारतीय बनावटीच्या भागांमुळे मोनोरेल धावली आता मोनोरेलच्या ताफयात एकूण ६ मोनोरेल असून फेऱ्यांमध्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच दोन मोनोरेलमधील अंतरही कमी होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -