घरदेश-विदेशछत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक; ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक; ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान

Subscribe

छत्तीसगडमध्ये जिल्हा राखीव दलाच्या जवानांना मोठं यश

छत्तीसगड येथील राजनंदगावमधील बगनादी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीतागोटा जंगल परिसरात नक्षलवादी आणि जिल्हा राखीव दलाच्या जवानांमध्ये आज चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

- Advertisement -

राजनंदगावमध्ये बागनदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सीतागोटा जंगलात ही चकमक अद्याप सुरू असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतागोटा जंगल परिसरात नक्षलवादी आणि जिल्हा राखीव दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी सात नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. त्यांच्याकडील शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अद्याप चकमक सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -