घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरच्या ३ माजी मुख्यमंत्र्यांना तात्काळ सोडा - शरद पवारांचे केंद्राला पत्र

जम्मू-काश्मीरच्या ३ माजी मुख्यमंत्र्यांना तात्काळ सोडा – शरद पवारांचे केंद्राला पत्र

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सहा इतर पक्षांच्या नेत्यांनी एक संयुक्त पत्र काढून जम्मू-काश्मीर मधील राजकीय पुढाऱ्यांचा बंदिवास संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे. विशेषतः जम्मू काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री म्हणजेच फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुला आणि मेहबुबा मुफ्ती यांना सोडण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

शरद पवार, ममता बॅनर्जी, एच.डी.देवेगौडा, सीताराम येचुरी, डी.राजा, मनोज कुमार झा, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी या नेत्यांनी आज एक संयुक्त पत्र लिहिले. या पत्रात म्हटले आहे की, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरच्या पुढाऱ्यांना बंदिवासात टाकल्यामुळे लोकशाहीवर आघात झाला आहे. संविधानाने दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा यामुळे ऱ्हास होत असून सामान्य माणसाच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. सरकारच्या या कृतीमुळे मतभेदाचा आवाज दाबला जात आहे.

- Advertisement -

तसेच तीनही माजी मुख्यमंत्र्यांची कुठलीही वादग्रस्त पार्श्वभूमी नाही. या तीन नेत्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षा किंवा सामान्यांच्या सुरक्षेला हानी पोहोचेल असा चुकीचा प्रसार काही जणांकडून करण्यात येत आहे. खरंतर भाजपने बंदीवासात टाकलेल्या तीनही नेत्यांशी भुतकाळात आघाडी केलेली आहे. अब्लुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती यांच्या पीडीपी सोबत भाजपने आघाडी केली होती, अशीही आठवण या पत्राद्वारे करुन देण्यात आली आहे.

- Advertisement -

संविधानातील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा मिळत नाही. त्यामुळेच या तीन मुख्यमंत्र्यांसहीत इतर पुढाऱ्यांची केलेली अटक ही संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कांच्या विरोधात आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. विरोधकांनी लिहिलेल्या या पत्रानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -