शिक्षकाचे विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य; पालकांनी चोपत गाठले पोलीस

सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या ५० वर्षी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

teacher beaten over misbehaviour with girl student in osmanabad
५० वर्षीय शिक्षिकाचे विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे

उस्मानाबादमधील एका नामाकिंत शाळेतील शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संतापलेल्या पालकांसह नागरिकांनी शाळेत जाऊन शिक्षकास बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी मोहन संपत सुरवसे (५०) या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीसोबत मागील काही दिवसांपासून हा शिक्षक अश्लली चाळे करत होता. सकाळी मुलगी घरी रडत आली. त्यामुळे घरातल्यांनी तिला विश्वासात घेऊन रडण्यामागचे कारण विचारले. त्यावर विद्यार्थींने घडलेल्या प्रकार आपल्या पालकांना सांगितला. आपल्याला शाळेतील एक शिक्षक मागील काही दिवसांपासून मांडीवर बसवून नको त्या ठिकाणी हात लावत असल्याचे तिने आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी शाळा गाठत शिक्षकाला याबाबत जाब विचारला. मात्र, ‘मी असे काही केलेच नाही’, अशी उडवाउडवीची उत्तप देऊ लागला. त्यानंतर पालकांनी त्याचे काहीही न ऐकता त्याला चांगलाच चोप दिला आणि त्याची रवानगी पोलिसांकडे केली.

या आरोपींनी यापूर्वी देखील शाळेत बिल काढण्यासाठी एकाकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर या शिक्षिकाला निलंबित करण्यात आले होते. मात्र, पुन्हा कामावर घेण्यात आल्यानंतर त्याचे हे कृत्य समोर आले आहे. तसेच हा आरोपी शिक्षक स्थानिक वृत्तपत्राचा बातमीदार असल्याचे सांगून अनेकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! महाविद्यलयाजवळ आढळून आला जळलेला पाय