घरदेश-विदेशशरद पवार नाराज नाहीत, कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी भेट राऊतांचा खुलासा

शरद पवार नाराज नाहीत, कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी भेट राऊतांचा खुलासा

Subscribe

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील बैठक संपन्न

महाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कितीही मोठी व्यक्ती असली तरी कायद्याने कारवाई केली जाईल. राज्यातील मोठ्या बदलांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार योग्य निर्णय घेतील असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेले होते. तब्बल अर्धा तास संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यातील अनेक मुद्द्यांवर आणि वाझे प्रकरणावर चर्चा झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा केली. वाझे प्रकरणावरुन शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला यावर राऊत म्हणाल की, शरद पवारांची नाराजी कधी पाहिली आहे का? असे म्हणत शरद पवारांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत नाही. परंतु ते चिंतर करत असतात माहिती घेत असतात आणि निर्णय घेत असतात. शरद पवार नाराज असल्याचे मला दिसले नाही.

- Advertisement -

राज्यातील बदल्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार योग्य माहिती देतील. या बैठकीत हवापाण्याची चर्चा झाली तसेच ही भेट एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले त्याबाबत चर्चा झाली असल्याचे शिवसेने खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -