घरदेश-विदेश'भारत माता की जय' शिया वक्फ बोर्डाची घोषणा

‘भारत माता की जय’ शिया वक्फ बोर्डाची घोषणा

Subscribe

भारत माता की जय या घोषणेला अनेकदा देशातील मुस्लिम संघटनांकडून विरोध झाल्याचे आपण पाहिले आहे. परंतु आता नेमके याच्याविरुद्ध गोष्ट घडली आहे उत्तर प्रदेशमधील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी स्वातंत्र्यदिनी भारत माता की जय ही घोषणा देण्याचे आदेश दिले आहेत.

मुस्लिम संघटनांनी आतापर्यंत देशभरात अनेक ठिकाणी ‘भारत माता की जय’ आणि वंदे मातरम सारख्या घोषणांना विरोध केला आहे. परंतु येत्या स्वातंत्र्यदिनी हे चित्र काही प्रमाणात बदलेल अशी आशा व्यक्त केली जात आहे, त्याला कारणही तसे आहे. उत्तर प्रदेशच्या शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, यंदाच्या स्वातंत्र्यदिनी शिया वक्फ बोर्डाच्या मालकीच्या सर्व इमारतींवर ध्वजारोहण केले जाईल. तसेच राष्ट्रगीत म्हटले जाईल. त्यानंतर जमलेल्या सर्व बांधवांना ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, हा आदेश जी व्यक्ती धुडकावेल किंवा अशा घोषणा न देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही रिझवी यांनी दिला आहे.

काय म्हणाले रिझवी?

‘शिया वक्फ बोर्डाच्या जितक्या मालमत्ता आहेत, इमारती आहेत, संस्था आहेत त्या सर्व ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वाजारोहणाचे कार्यक्रम होतील. त्यानंतर राष्ट्रगीत सादर केले जाईल. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणाही द्यायच्या आहेत. जो या आदेशाचे पालन करणार नाही त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल’. असा इशाराही रिझवी यांनी दिला आहे.

- Advertisement -

कोण आहेत रिझवी

रिझवी हे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत. अनेकदा ते त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्याला ठरावीक लोकांकडून नेहमीच विरोध केला जातो. राम मंदिराबाबत त्यांनी अनेकदा अनुकुलता दाखवली आहे. राम मंदिर उभारण्यासाठी त्यांनी १० हजार रुपयांचे दानही दिले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुस्लिमांच्या दाढीवर आक्षेप घेत दाढी वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -