घरदेश-विदेशTiranga Yatra : तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्यासह 9 काँग्रेस...

Tiranga Yatra : तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्यासह 9 काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील रिज मैदानावर मंगळवारी तिरंगा यात्रा काढणे आमदाराला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह, युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष यदोपती ठाकू यांच्यासह 9 काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. शिमला येथील सदर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. या नेत्यांविरोधात कलम 144 चे उल्लंघन करणे आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सर्वांविरोधात कलम 40/2022 अन्वये 143,188 IPC अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

खलिस्तानी दहशतवादी संघटना एसजेएफ (SJF) च्या धमकीशी संबंधित हे सर्व प्रकरण आहे. विक्रमादित्य सिंह यांना या संघटनेचा नेता पुन्नू याने 29 मार्च रोजी शिमल्यात खलिस्तानचा झेंडा फडकावण्याची धमकी दिली होती. याला प्रत्युत्तर म्हणून विक्रमादित्य सिंह यांनी मंगळवारी शिमल्यातील रिज मैदानावर तिरंगा यात्रा काढली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते यदोपती ठाकूर यांच्यासह युवा काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी यात्रेला सर्वांना सीटीओजवळ रोखले. मात्र यात्रेत सहभागी लोकं थांबले नाहीत आणि त्यांनी रिजच्या मैदानावर दाखल होत घोषणाबाजी करत तिरंगा फडकवला.

- Advertisement -

संबंधित लोकांविरोधात एफआयआर दाखल

शिमला पोलिसांनी याप्रकरणी हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि शिमला ग्रामीणचे आमदार विक्रमादित्य सिंह, युवा काँग्रेसचे नेते यदोपती ठाकूर, छत्तर सिंह, राहुल मेहरा, वीरेंद्र बंशू, अमित ठाकूर, राहुल चाहौन, दिनेश चोप्रा, दीपक खुराना यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रमादित्य सिंह यांची प्रतिक्रिया

तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह म्हणाले की, तिरंगा फडकवल्याप्रकरणी आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण काहीही झाले तरी तिरंग्याच्या सन्मानाची किंमत आम्ही देऊ.


Navneet Rana : नवनीत राणांच्या हक्कभंग तक्रारीनंतर मुंबई पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालकांना नोटिसा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -