घरमनोरंजनRRR Box Office Collection | आरआरआर सिनेमाने केला 100 कोटींचा गल्ला पार

RRR Box Office Collection | आरआरआर सिनेमाने केला 100 कोटींचा गल्ला पार

Subscribe

एसएस राजामौली यांचा आरआरआर म्हणजेच 'रौद्रम रणम रुधिराम' या चित्रपटाची सुरुवात चांगली असल्याने यावरून असे वाटते की, हा चित्रपट एसएस राजामौली यांच्या मागील चित्रपट बाहुबलीच्या 2 (Bahubali 2) कमाईचा विक्रम मोडीत काढेल.

एसएस राजामौली (S.S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) हे मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला पार केला असून, हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होणार आहे. आरआरआर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कोरोनानंतर आरआरआर, द काश्मीर फाइल्स, सूर्यवंशी तसेच गंगूबाई काठियावाडी, 83 या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.

एसएस राजामौली यांचा आरआरआर म्हणजेच ‘रौद्रम रणम रुधिराम’ या चित्रपटाची सुरुवात चांगली असल्याने यावरून असे वाटते की, हा चित्रपट एसएस राजामौली यांच्या मागील चित्रपट बाहुबलीच्या 2 (Bahubali 2) कमाईचा विक्रम मोडीत काढेल. बाहुबली 2 या चित्रपटाने पहिल्या दिवशी 121 कोटींची कमाई केली होती. आरआरआर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 130 कोटींचे कलेक्शन केले. त्याचप्रमाणे हा चित्रपट तेलुगू, तमीळ, मल्याळ्यम, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित केला होता. तर तेलुगू 100.13 कोटी, तमीळ 6.5 कोटी, मल्याळ्यम 3.1 कोटी आणि कन्नडमध्ये 20 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता.

- Advertisement -

एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाच्या पाचव्या दिवशीच्या कमाईची आकडेवारी कमी दिसत आहे. मंगळवारी या चित्रपटाने 40 कोटींची कमाई केली आहे. परंतु बाहुबली 2 या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 500 कोटींचा आकडा पार केला होता. आता आरआरआर या चित्रपटानं बाहुबली 2 चित्रपटाला कमाईच्या बाबतीत पछाडल्याचं चित्र समोर आले आहे. एसएस राजामौलींचा आरआरआर हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ओटीटीवर (OTT) प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -