घरताज्या घडामोडीशोलेच्या गब्बर सारखी 'ऑपरेशन कमळ'ची दहशत; पण गेहलोतांनी कमळाचेच ऑपरेशन केले

शोलेच्या गब्बर सारखी ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत; पण गेहलोतांनी कमळाचेच ऑपरेशन केले

Subscribe

राजस्थानमध्ये मागच्या एक महिन्यापासून सुरु असलेला राजकीय संघर्ष अखेर संपला. नाराज पायलट यांनी पुन्हा गेहलोत आणि काँग्रेससोबत जुळवून घेत घरवापसी केली. या सत्तानाट्यानंतर सामनातून भाजपवर शरसंधान करण्यात आले आहे. “राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो. शोले चित्रपटातील गब्बर सिंगप्रमाणे ऑपरेशन कमळची दहशत निर्माण केलीच होती. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करुन भाजपला धडा दिला”, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

या अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे –

सचिन पायलट यांनी माघार घेतल्यानंतर महिनाभराच्या घोडेबाजारात भाजपचे हसे झाले आहे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो. सचिन पायलट यांचे बंड यशस्वी झाले नाही. कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांचा मोठा आकडा जमवू शकले नाहीत व अशोक गेहलोत यांची खिंड भाजप भेदू शकला नाही. जे उपाय भाजप राबवत होता, तेच उपाय अशोक गेहलोत यांनी वापरुन भाजपचा घोडेबाजर उधळला.

- Advertisement -

मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टहास लोकशाहीत का बाळगावा? महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱ्या नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. राजस्थानात काम फसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरू करायचे हे कसले धोरण? महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता? अशी टीका नारायण राणे यांच्यावर नाव न घेता करण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -