घरदेश-विदेशचीनी कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी

चीनी कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी

Subscribe

१००० कोटींचे हवाला घबाड आयकर विभागाच्या हाती लागलं

आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली चिनी नागरिक, कंपन्या आणि त्यांचे भारतीय सहकारी यांच्या तळांवर छापे टाकले आहेत. मंगळवारी दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्राम येथे आयकर विभागाने २१ ठिकाणी छापे टाकले. काही भारतीयांच्या मदतीने या चिनी नागरिकांनी अनेक शेल कंपन्या बनवल्या आणि हवाला आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अवैध व्यवहार केल्याचा आरोप आहे. अधिसूचना मिळाल्यानंतर छापोमारीला सुरुवात करण्यात आल्याचं आयकर विभागाने सांगितलं.

आयकर विभागाला मिळलेल्या माहितीत, विभागाला कळालं की शेल कंपन्यांच्या मदतीने काही चिनी नागरिक आणि त्यांचे भारतीय भागीदार लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारात गुंतले आहेत. नंतर, तपासणी दरम्यान असं आढळलं की बनावट कंपन्यांमध्ये चिनी नागरिकांची ४० पेक्षा जास्त बँक खाती आहेत. या बँक खात्यांच्या मदतीने १००० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अवैध व्यवहार झाले आहेत. त्याचबरोबर चिनी कंपनीच्या नियंत्रित कंपनीने भारतात किरकोळ व्यवसाय सुरू करण्यासाठी शेल कंपन्यांकडून १०० कोटी रुपयांचे बोगस व्यवहारकेले आहेत.

- Advertisement -

या धाडीत विभागाला हवाला संबंधीची कागदपत्रे आणि बँक कर्मचारी, अवैध कामांमध्ये सीएच्या सहभागाचे पुरावे सापडले आहेत. या प्रकरणात लुओ संग याला अटक करण्यात आली आहे, जो चार्ली पंग या नावाने भारतात राहत होता. त्याच्याकडून मणिपूरचा पत्ता असलेला बनावट भारतीय पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे बनावट नावांनी ८ ते १० बँक खाती आहेत.


हेही वाचा – सोशल मीडियावरील चिथावणीखोर पोस्टने बंगळुरु पेटलं; दोघांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -