घरताज्या घडामोडीपुलवामामध्ये चकमक! एक जवान शहीद, तर दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश

पुलवामामध्ये चकमक! एक जवान शहीद, तर दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश

Subscribe

जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी व जवानांमध्ये चकमक सुरू झाली आहे. पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा येथे बुधवारी पहाटे जवानांनी दोन दहशतवाद्यांना घेरले आणि चकमकीला सुरूवात झाली. आत्तापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.

- Advertisement -

जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक एके ४७ रायफल, हॅण्डग्रेनेड आणि अन्य घातपात घडवणारा शस्त्रसाठा देखील हस्तगत केला आहे. जवानांनी सर्व परिसरात वेढा दिला आहे.

पाकिस्तानकडून एलओसी वर कुरपती करणे सुरूच आहेत. वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबरोबरच घुसखोरीचे देखील प्रयत्न केला जात आहे. या आगोदर २९ जुलैला राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यावेळी दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा देखील करण्यात आला होता.

- Advertisement -

त्याचबरोबर उत्तर काश्मीरमधील केरन व मच्छल सेक्टर आणि राजौरीच्या कलला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार सुरू असलेल्या गोळीबारासही भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -