घरताज्या घडामोडीपत्रप्रयोग म्हणजे चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’

पत्रप्रयोग म्हणजे चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’

Subscribe

नाटक नीट बसले नाही आणि पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले. पण, नवा प्रयोग नव्या संचात राहुल गांधींनी लवकरच राजकीय मंचावर आणला नाही तर लोक नाटकाचे पडदे आणि प्रॉपर्टी चोरून नेतील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या पाच मुख्यमंत्र्यांसह २३ नेत्यांनी पत्र लिहित पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी आणि लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरुन निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. काँग्रेसमधील ‘पत्र’पुढाऱ्यांचा पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’ या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता, अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेत्यावर टीका करतानाच शिवसेनेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले

‘राज्याराज्यांचे काँग्रेसचे वतनदार स्वतःपुरते पाहत आहेत. त्यामुळे पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. त्यांचे पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. हा नवा राजकीय कोरोना व्हायरसच म्हणावा लागेल. त्यामुळे याला सोनिया गांधी किंवा राहुल गांधी तरी काय करणार?, असे म्हणत, शिवसेनेने ज्येष्ठ काँग्रेस नेत्यावर टीका करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

‘पत्र पुढाऱ्यां’नी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही, असे सांगतानाच काँग्रेस वर्किंग कमिटीतील वादळ आणि आधीचे पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’ या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता. नाटक नीट बसले नाही आणि पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले. पण, नवा प्रयोग नव्या संचात राहुल गांधींनी लवकरच राजकीय मंचावर आणला नाही तर लोक नाटकाचे पडदे आणि प्रॉपर्टी चोरून नेतील, असा इशारा दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेनेने दिला आहे.


हेही वाचा – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली आज GST कौन्सिलची बैठक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -