घरमहाराष्ट्रMaha Politics : भाजपाचा आमच्यावर दबाव..., लोकसभा उमेदवारीबाबत संजय शिरसाटांचे भाष्य

Maha Politics : भाजपाचा आमच्यावर दबाव…, लोकसभा उमेदवारीबाबत संजय शिरसाटांचे भाष्य

Subscribe

भाजपाकडून जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यात येत आहे का?, असा प्रश्न शिरसाट यांना विचारला असता, त्यांनी याबाबत उत्तर दिले आहे.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करून देखील महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. पंरतु, येत्या दोन दिवसांत महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर केले जातील, असे युतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. याचबाबत आता शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. भाजपाकडून जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यात येत आहे का?, असा प्रश्न शिरसाट यांना विचारला असता, त्यांनी याबाबत उत्तर दिले आहे. (Sanjay Shirsat important statement regarding allocation of seats in the Grand Alliance)

हेही वाचा… Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीविषयी जरांगेंची स्पष्ट भूमिका, समाजासमोर ठेवले दोन पर्याय

- Advertisement -

जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, भाजपाचा आमच्यावर कोणताही दबाव नाही. तसेच दबाव टाकण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. लोकसभेचे उमेदवार ठरवत असताना त्या मतदारसंघातील जनमताची चाचणी करून उमेदवार ठरवले जात आहेत. तसेच उमेदवार ठरविण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे कोणाच्या दबावतंत्राला बळी पडतील, असे आम्हाला वाटत नाही. येत्या मंगळवारी ते शिवसेनेचे उमेदवार जाहीर करतील, असे आम्हाला वाटते. त्यामुळे विद्यमान भावना गवळी, सदाशिव लोखंडे, गजानन किर्तीकर आणि इतर दोन खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या चर्चांवर भाजपाकडून नेमका काय निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच, यावेळी प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, मी आजवर जी जी भाकिते केली ती सर्व खरी ठरली आहे. अजित पवार, अशोक चव्हाण, रवींद्र वायकर यांच्याबाबत जे जे बोललो, ते झालेले आहे. म्हणून मला वाटते कदाचित मला भविष्य वर्तविण्याचा छंद लागला की काय. पुढील काही दिवसात छत्रपती संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नेते शिंदे गट, भाजपामध्ये सहभागी होणार आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. तर, महायुतीच्या तीनही पक्षात मंगळवारी अनेक नेते प्रवेश करणार असल्याचे भाकीतही शिरसाटांकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -