घरदेश-विदेशधक्कादायक! 20 वर्षाच्या विवाहित महिलेला झाडाला टांगून केली बेदाम मारहाण

धक्कादायक! 20 वर्षाच्या विवाहित महिलेला झाडाला टांगून केली बेदाम मारहाण

Subscribe

20 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या सासरच्यांना न सांगता तिच्या मामाच्या घरी गेल्याच्या कारणावरुन विवाहितेला तिच्या माहेरच्या लोकांनी झाडाला बांधून काठीने तसेच मोठ्या दांड्याने निर्दयपणे मारहाण केली.

मध्य प्रदेशात माणूसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय विवाहित महिलेला झाडाला टांगूण तिला जबर मारहाण केल्याचा अमानूषपणा एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच संपुर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. संबधित घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अलिराजपूर जिल्ह्यातील एका गावाची असून. एका 20 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या सासरच्यांना न सांगता तिच्या मामाच्या घरी गेल्याच्या कारणावरुन विवाहितेला तिच्या माहेरच्या लोकांनी झाडाला बांधून काठीने तसेच मोठ्या दांड्याने निर्दयपणे मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral) झाला आहे.  ( 20-year-old married girl brutally beaten up by hanging from a tree)
धक्कादायक माहिती समोर येताच मध्य प्रदेशातील पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला संबधित घटनेबाबत पोलिसांनी सांगितले आहे की पीडित महिलेच्या चार भावांना शुक्रवारी आयपीसीच्या कलम 151 अंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता तेथून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक भागवानी यांच्या माहितीनूसार, पीडीत विवाहीत महिलेचे नुकतेच लग्न झाले होते तसेच पती कामानिमित्त परराज्यात गेल्यामुळे मुलगी सासरी न सांगता मामाकडे गेल्याने तिचा राग आल्यावर तिच्या आई-वडिलांनी तिला घरी आणल्यानंर मारहाण करण्यास सुरूवात केली. यादरम्यान एकाने या घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. ते म्हणाले की या प्रकरणात 1 जुलै रोजी रात्री बोरी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तिचे भाऊ केलसिंह निनामा, कारम निनामा, दिनेश निनामा आणि उदय निनामा यांच्यावर आयपीसी कलम 355, 323, 294 आणि 506 अंतर्गत आरोपी म्हणून कारवाई करण्यात आली आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – Vaccine: लसीचे दोन डोस घेतल्याने कोरोनापासून ९८ टक्के बचाव – केंद्राची माहिती



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -