घरताज्या घडामोडीबंडातात्यांना अटक करुन सरकारने काय साध्य केले? फडणवीसांचा संतप्त सवाल

बंडातात्यांना अटक करुन सरकारने काय साध्य केले? फडणवीसांचा संतप्त सवाल

Subscribe

बंडातात्यांवर थेट अटकेची कारवाई करणे हे सर्वार्थाने चुकीचे असल्याचे म्हणत फडणवीसांनी या घटनेचा तीव्र निषेध केला

राज्य सरकारने पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जारी केलेल्या नियमांचा निषेध करत ह.भ.प. बंडातात्या कराडकरांनी आज पंढरपूरच्या दिशेने पायी वारी काढली. राज्य सरकारचे सर्व नियम धुडकावून बंडातात्यांनी राज्यातील वारकऱ्यांना या पायी वारीत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी बंडाताचत्यांना ताब्यात घेतले. बंडातात्यावर झालेल्या या कारवाईनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बंडातात्या कराडकरांना अटक करुन सरकारने काय साध्य केले? असा संतप्त सवाल यावेळी फडणवीसांना उपस्थित केला आहे. (What did the government achieve by arresting the Banda Tatya Karadkar? Angry question of Fadnavis)


‘वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. विठ्ठल आणि वारकरी यांचे नाते अवर्णनीय आहे.बंडातात्यांना अटक करुन सरकारने काय साध्य केले? यासाठी काहीच मध्यम मार्ग नव्हता का? हा वारकऱ्यांचा केलेला अपमान आहे?’, अशी संतप्त प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.  बंडातात्यांवर थेट अटकेची कारवाई करणे हे सर्वार्थाने चुकीचे असल्याचे म्हणत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेधही व्यक्त केला आहे.

- Advertisement -

शनिवारी पहाटेपासून बंडातात्या कराडकर यांनी आळंदीहून आपल्या समर्थकांसोबत पायी वारीला सुरुवात केली होती. वारीदरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवले. त्याला कार्यालयात ठेवताच बंडातात्यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर भजने आंदोलन करण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळानी बंडातात्या यांनी हे आंदोलन मागे घेतल्याचे सांगण्यात आले. वारकऱ्यांमध्ये एकी नसल्याने आम्हाला आंदोलन मागे घ्यावे लागत असल्याचे बंडातात्यांकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – दिनो मौर्या हा BMC चा सचिन वाझे, नितेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -