घरदेश-विदेशShradh Pujan: काही कारणास्तव श्राद्ध करणं शक्य नाही! करा 'हे' उपाय

Shradh Pujan: काही कारणास्तव श्राद्ध करणं शक्य नाही! करा ‘हे’ उपाय

Subscribe

श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवणाचा घास देऊन त्यांना प्रसन्न करणे. सनातन मान्यतेनुसार, ज्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्यांना एका विशिष्ट दिवशी जेवण दिले जाते त्याला श्राद्ध म्हणतात. तर श्राद्धा पक्ष म्हणजे पित्रांना स्मरण करण्याची संधी.

श्राद्ध पक्षात दररोज सकाळी नित्यकर्म करून काळे तीळ पाण्यात टाका आणि पूर्वजांना दक्षिणेकडे तोंड करून पाणी अर्पण करा. त्याचप्रमाणे श्राद्धातील दररोज सकाळी ९ वाजण्यापूर्वी आपल्या पूर्वजांना असे पाणी अर्पण करा. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पित्रांना शांती मिळते, ज्यामुळे ते प्रसन्न होतात, परंतु काही लोकांना तारीख आणि पूजा यांचे ज्ञान नसल्यामुळे ते श्राद्ध करु शकत नाहीत. अशा परिस्थितीत पितृदोषमुळे त्याच्या आयुष्यात बर्‍याच समस्या निर्माण होतात. म्हणून, पुराणानुसार, पित्रांना संतुष्ट करण्यासाठी काही विशेष उपाय देखील करता येतात

करा हे काही उपाय

  • सकाळी आंघोळ करुन तांब्याच्या भांड्यात कच्चे दूध, जव, तीळ आणि तांदूळ घाला. त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून ते पाणी पिंपळाला अर्पण करा. यामुळे पितृदेव प्रसन्न होतील.
  • गायींना हिरवा चारा घाला आणि गोठ्यात जाऊन दक्षिणेकडे तोंड करा. पाण्यात कच्चे दूध मिसळून ते पित्रांना अर्पण करा, यामुळे पित्र शांत होतात.
  • पितृपक्षात दररोज ब्राह्मणाला जेवणास बोलवा किंवा मंदिरातील पुजाऱ्यांना दररोज अन्न धान्य दान करा. यासह आपल्या श्रद्धेनुसार दक्षिणा द्या.
  • सर्वपित्री अमावस्येला भाताचे पिंड बनवून त्यावर जव आणि तीळ घाला. नंतर ते पांढऱ्या कपड्यात घालून पानांवर ठेवा आणि पवित्र नदीत टाका.
  • ज्या घरात पिण्याचे पाणी ठेवलेले असते तेथे तूपांचा दिवा लावून पितृदेव प्रसन्न होतात.
  • एक मूठ काळे तिळ दान करा.
  • एखाद्या विद्वान ब्राह्मणाला दान दिली तर तुमचे पूर्वजसुद्धा तृप्त होतील.

जाणून घ्या, पितृपक्षाची सुरूवात कशी झाली? महाभारतात दडलंय श्राद्धाचे पौराणिक रहस्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -