घरदेश-विदेशसोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, 'या' विषयावर होणार चर्चा!

सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, ‘या’ विषयावर होणार चर्चा!

Subscribe

येत्या शुक्रवारी २२ मे रोजी होणार विरोधी पक्षांची बैठक

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून तो ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यानुसार केंद्र सरकारने राज्यांना ग्रीन, रेड, आणि ऑरेंज झोन ठरवण्याचे अधिकार दिले आहेत. देशात असणाऱ्या कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा केंद्रीय बैठकीत घेतला जाण्याची शक्यता असताना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.

‘या’ विषयावर होणार चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २२ मे रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. करोना व्हायरसच्या दरम्यान लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे आलेले संकट आणि स्थलांतरीत मजुरांचे होणारे हाल या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असणार आहे.

- Advertisement -

१७ मे नंतर काय?; सोनिया गांधींचा सरकारला सवाल

लॉकडाऊन असल्याने देशातील स्थलांतरीत मजुरांचे मोठे हाल होत असून त्यांना त्यांच्या गावी जाणं अशक्य होत आहे. त्यामुळे अनेक मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत तर काही जण ट्रकवर बसून गावाकडे जात आहेत. यावेळी काही ठिकाणी अपघात होऊन स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना देखील समोर आल्या आहे. त्यामुळे सध्या असणारी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

एकूण २० पक्षांचे नेते होणार सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलीन, माकप नेते सीताराम येच्युरी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह एकूण २० पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -