घरदेश-विदेशSonia Gandhi : 'माँ, यादें और मुरब्बा'; स्वयंपाकघरातील व्हिडीओमधून राहुल गांधींचा भाजपावर...

Sonia Gandhi : ‘माँ, यादें और मुरब्बा’; स्वयंपाकघरातील व्हिडीओमधून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : खरं तर नवीन वर्ष 2024 स्वागत करण्यासाठी आपण सर्व सज्ज झालो आहोत. असे असतानाच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सोनिया गांधी त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी सांगताना दिसत आहेत. तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधीही ऑरेंज जाम बनवताना दिसले. राहुल सांगतात की तो त्याची बहीण प्रियंका गांधी यांनी दिलेल्या रेसिपीमधून मुरब्बा बनवत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये स्वतः सोनिया गांधी सांगत आहेत की, परदेशातून परतल्यानंतर त्यांच्या जेवणात त्यांना ‘तूरडाळ आणि तांदूळ’ असायलाच हवेत. (Sonia Gandhi Mother memories and marmalade Rahul Gandhi targets BJP from kitchen video)

हेही वाचा – New Year Celebration : ‘या’ देशांनी सर्वात आधी केलं नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत; आतषबाजीने उजळलं आसमंत

- Advertisement -

‘माँ, यादें और मुरब्बा’ या शीर्षकाने काँग्रेसने शेअर केलेला व्हिडीओ इंटरनेट युजर्सना पसंत पडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सोनिया आणि राहुल यांचे वैयक्तिक संभाषण आणि जेवणाबाबत हलकीशी चर्चाही होताना दिसत आहे. मुरब्बा बनवताना राहुल गांधी यांनी राजकीय चवही वाढवली आहे. भाजपवाल्यांना मुरब्बा चाखायचा असेल तर तेही मजा घेऊ शकतात का? असा प्रश्न राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधी यांना विचारतात. यावर सोनिया गांधी त्यांना ठणकावून सांगिताना दिसत आहेत की, ते (भाजपा) जाम आमच्याकडे परत फेकतील. यावर राहुल जोरजोरात हसताना दिसत आहेत.

- Advertisement -

खाद्यपदार्थांच्या पसंतीबाबत सोनिया गांधी म्हणाल्या, जेव्हा एखादा भारतीय परदेशात जातो तेव्हा अन्नपदार्थांशी जुळवून घेणे आव्हानात्मक असते. त्याचप्रमाणे, जेव्हा मी पहिल्यांदा भारतात आली तेव्हा मला तिला भारतीय मसाले, चव, विशेषतः मिरची यांच्याशी जुळवून घेण्यास बराच वेळ लागला. सुरुवातीला मला ‘हिरवे धणे’ आवडत नव्हते, पण आता मला ते खूप आवडतात. यावेळी राहुल गांधी त्यांच्या चवीबद्दल सांगताना म्हणतात की, मला आधी लोणचे आवडत नव्हते, मात्र आता अगदी आवडीने खातो. लोणच्याच्या बाबतीत, सोनिया गांधी यांनीही कबूल केले की, मलाही लोणचे आवडायला आधी वेळ लागला, पण आता खूप आवडते. सोनिया गांधी सांगतात की, जेव्हाही मी ती परदेशातून भारतात परतते, तेव्हा मला जेवणात सर्वप्रथम ‘तूरडाळ आणि भात’ खायला पाहिजे असते.

हेही वाचा – Submarine Project : पाणबुडी प्रकल्प आहे, ती पाण्यात बुडाली तर…; शिंदे गटाने आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

पोषणाबाबतचे माझे मत बापूंपेक्षा थोडे वेगळे

व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खाण्याच्या सवयींचाही उल्लेख केला आहे. अन्नाविषयीचा विशेष दृष्टीकोन आणि पोषण विषयीच्या दृष्टिकोनाबाबत राहुल गांधी म्हणाले की, पोषणाबाबतचे माझे मत बापूंपेक्षा थोडे वेगळे आहे. दरम्यान, शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी व्हिडीओच्या शेवटी तयार मुरब्बा बरणीत पॅक करताना दिसत आहेत. बरणीवर लिहिले आहे की, हा मुरब्बा जवळच्या मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -