घरदेश-विदेशगांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्यावरून गदारोळ

गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्यावरून गदारोळ

Subscribe

काँग्रेस, डीएमकेच्या खासदारांची घोषणाबाजी

नवी दिल्ली8काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेली स्पेशल प्रोटेक्शन फोर्सची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्यावरून मंगळवारी लोकसभेत एकच गदारोळ झाला. काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेचे कामकाज सुरू होताच घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनाकडे धाव घेतली. गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा पुन्हा द्या, अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यावरून काँग्रेससह, डीएमकेच्या खासदारांनी सभात्यागही केला.

केंद्र सरकारने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, तसेच पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना देण्यात आलेली एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आता या नेत्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या बंगल्यांवरील एसपीजी सुरक्षा हटवण्यात आली आहे.

- Advertisement -

सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे ही सुरक्षा प्राप्त करणारे सामान्य व्यक्ती नसल्याचे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील गांधी कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा दिली होती. सन १९९१ पासून आतापर्यंत जेव्हा जेव्हा केंद्रात एनडीएची सत्ता आली, तेव्हा त्यांची एसपीजी सुरक्षा कधीही हटवण्याचा निर्णय कधीही घेण्यात आलेला नाही याकडे अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. काँग्रेसचे खासदार व्हेलमध्ये उतरून ’राजकारण बंद करा’,. ’एसपीजीचे राजकारण बंद करा’ आणि ’आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा देत होते. त्यांच्यात डीएमकेचेही खासदार सहभागी झाले. काही वेळानंतर काँग्रेस आणि डीएमकेच्या खासदारांनी सभात्याग केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -