घरताज्या घडामोडीसावधान! आता 'या' ठिकाणी थुंकाल तर तुरुंगाची हवा खाल

सावधान! आता ‘या’ ठिकाणी थुंकाल तर तुरुंगाची हवा खाल

Subscribe

आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडेल महागात.

कोरोनाने चीनसह सार्‍या जगाला हादरवल्यानंतर शिस्त आणि बेशिस्तीचा रंग पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण कोरोना विषाणूचा संसर्ग थुंकीतून अधिक वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. मात्र, अनेक जण अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडतात, अशा नागरिकांना मास्क लावणे बंधनकार करण्यात आले आहे. याशिवाय आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच कोरोनाबाधित परिसरात थुंकणे अधिकच महागात पडणार आहे.

२ हजार रुपये दंड

दिल्ली महापालिकेच्या सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याचे एमसीडीने आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर २ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार असून ज्या व्यक्ती अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडतात अशा लोकांना सामान्यपेक्षा १० पट किंवा जास्त दंड आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित भाग असलेल्या परिसरात एखाद्या व्यक्तीला थुंकताना पकडले गेले तर त्याला तुरूंगवासाची शिक्षासुद्धा होऊ शकते. दरम्यान, गुरुवारी हा आदेश तिन्ही एमसीडी भागात देण्यात आला आहे.

- Advertisement -

एका व्यक्तीविरोधात कारवाई

दिल्ली येथे एका सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात एमसीडी ऑफिसरने गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – Coronavirus : लहानग्यांनी दिला कोरोनाशी लढण्याचा संदेश, व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -