घरदेश-विदेश'देशात पहिल्यांदा एवढा मोठा अत्याचार पाहिला'

‘देशात पहिल्यांदा एवढा मोठा अत्याचार पाहिला’

Subscribe

दिल्लीतील हिंसाचार हे केंद्रीय गृहमंत्र्याचे अपयश आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली आहे. देशाला आणि राज्याला शांततेची गरज आहे. मारहाण करणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपच्या कार्यकाळात पाच वर्षात गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भिती असल्यामुळे विरोधक अधिवेशनात गोंधळ घालत आहेत. बारामती येथील रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (17 डिसेंबर) पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ग्रंथालय हे शांततेचं ठिकाण आहे. मात्र दिल्लीत ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला. दिल्लीत झालेला हिंसाचार हा देशाच्या गृह मंत्रालयाचं मोठं अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रकारचा अत्याचार पाहिला आहे. देशाला,राज्याला शांततेची गरज आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. सध्या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. त्याचप्रमाणे राज्यातही विरोधक त्यांच्या कार्यकाळात पाच वर्षात गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भिती असल्यामुळे विरोधक अधिवेशनात गोंधळ घालत आहेत. असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

राज्यातल्या सरकारचं पहिलंच अधिवेशन आहे. त्यामध्ये चांगली चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र, विरोधकांकडून कोणतीही चर्चा न करता गोंधळ घातला जात आहे. अस म्हणत त्यांनी विरोधकांवर निशामा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -