घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरच्या सोपोर पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला; दोन पोलीस गंभीर

जम्मू-काश्मीरच्या सोपोर पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला; दोन पोलीस गंभीर

Subscribe

दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनवर आधी ग्रेनेड हल्ला केला त्यानंतर फायरिंग करुन फरार झाले. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस गंभीर जखमी झाले.

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहितीमिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. असे सांगितले जात आहे की, दहशतवादी अजूनही याच परिसरामध्ये लपून बसले आहेत. ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

असा केला पोलीस स्टेशनवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केले आहे. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी सोपोर येथील एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनवर आधी ग्रेनेड हल्ला केला त्यानंतर फायरिंग करुन फरार झाले. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस गंभीर जखमी झाले. त्यांनी जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेश सुरु केले आहे.

४ दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे शुक्रवारी सकाळी सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास जवानांना यश आले. या दहशतवाद्यांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. हे पोलीस अधिकारी हत्यार घेऊन गुरुवारी फरार झाले होते. त्यानंतर ते दहशतवाद्यांना जाऊन भेटले. घटनास्थळावरुन जवानांनी शस्त्रसाठा आणि एके ४७ रायफल्स जप्त केल्या. जवानांना शुक्रवारी रिहाशयी परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सर्च ऑपरेशन सुरु केले असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि चकमक झाली.

- Advertisement -

हेही वाचा – 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -