घरमहाराष्ट्रनाशिकपरीक्षार्थी पत्नीला शिक्षक पतीने पुरवली कॉपी

परीक्षार्थी पत्नीला शिक्षक पतीने पुरवली कॉपी

Subscribe

मविप्र संस्थेच्या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयातील प्रकार, शिक्षक फरार

डी. एड.ची परीक्षा देणाऱ्या पत्नीला शिक्षक पतीने कॉप्यांचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी, ७ जून रोजी उघडकीस आला. गंगापूर रोडवरील मविप्र संस्थेच्या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात बिल्डिंग कंडक्टर यांनी कारवाई शिक्षकाला रंगेहात पकडल्यानंतर आता शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डी. एड.च्या परीक्षा सुरू आहेत. त्याचे केंद्र महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात असल्याने, शुक्रवारी येथील महिला परीक्षार्थीला एक व्यक्ती कॉपी पुरवत असल्याचे बिल्डिंग कंडक्टर तथा प्राचार्य संजय काळोगे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्या किरण बडगुजर नामक शिक्षकाला पकडून केंद्र प्रमुखाकडे नेले. तसेच, परीक्षार्थी भावी शिक्षिकेचा पेपर जप्त केला. मात्र, काही वेळात संधी साधत शिक्षक येथून फरार झाला. हा शिक्षक जिल्हा परिषदेच्या पेठ तालुक्यातील कोटंबी शाळेवर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

भावी शिक्षिकेला कॉपीचा आधार

डी.एड.ची परीक्षा देऊन भविष्यात शिक्षिका बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावी शिक्षिकेला विद्यमान शिक्षकच कॉपी पुरवत असल्याच्या प्रकाराने ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रालाही कलंक लागला आहे. कॉपीचा आधार घेऊन शिक्षक बनणार असतील तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा, असा गंभीर प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -