घरमनोरंजनअर्जुन कपूरच्या बालपणीच्या फोटोवर अशी म्हणतेय मलायका!

अर्जुन कपूरच्या बालपणीच्या फोटोवर अशी म्हणतेय मलायका!

Subscribe

व्हायरल होणाऱ्या फोटोवर मलायकाने केलेली कमेंट ठरतेय लक्षवेधी

बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा खान यांच्या मैत्रीची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहे. बॉलिवूडचे इव्हेंट असो किंवा पार्टीशिवाय दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अर्जुन कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे मलायका अरोराची कमेंट. या फोटोवरची कमेंट सर्वाधिक वाचली जात आहे.

- Advertisement -

अर्जून कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जून खेळण्यातील घोड्यावर बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करतांना अर्जून कपूरने आपल्या आगामी चित्रपट पानीपत संदर्भात सांगितले की, ‘आपल्या आयुष्याची सुरूवात घोडेसवारी शिकण्यापासूनच केली होती. मला नेहमीच वाटायचे की पुढे जाऊन पानीपत करणार.’

- Advertisement -

या व्हायरल होणाऱ्या फोटोवर मलायकाने कमेंट करत विचारले की, ‘तू एवढा रागात का आहे?’ दरम्यान हे दोघेही कलाकार एक दुसऱ्यांच्या फोटोवर कमेंट करत असतात. काही दिवसांपुर्वी मलायकाने आपला एक फोटो शेअर केला होता, त्यावर अर्जूनने कमेंट केली होती, ती खूप व्हायरल झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -