घरदेश-विदेशथायलंडमध्ये पाळणाघरात गोळीबार, २२ चिमुकल्यांसह ३४ जणांचा मृ्त्यू

थायलंडमध्ये पाळणाघरात गोळीबार, २२ चिमुकल्यांसह ३४ जणांचा मृ्त्यू

Subscribe

थायलंडच्या एका चाईल्ड सेंटरमध्ये अंदाधूंद गोळीबार झाला असून यामध्ये लहान मुलांसह ३४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. एका माजी पोलिसाने हा गोळीबार केला असून त्याने आपल्या पत्नी आणि मुलीला ठार मारून स्वतःही आत्महत्या केली आहे.

थायलंड येथील नॉन्ग बुआ लम्फू प्रांतातील लहान मुलांना सांभाळणाऱ्या डे केअर सेंटरवर गुरुवारी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ३४ लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये २२ लहान मुलं आहे. हल्लेखोर माजी पोलीस अधिकारी होता. तो आधीपासूनच व्यसनाधीन असल्याने पोलिस खात्यातून त्याला निवृत्ती देण्यात आली होती. सुरुवातीला हल्लेखोराने आठ महिन्याची गर्भवती असलेल्या एका शिक्षिकेसह चार-पाच कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. सुरुवातीला लोकांना वाटलं ही आतिशबाजी सुरू आहे. मात्र, नंतर गोळीबार असल्याचं लक्षात येताच नागरिकांचा गोंधळ सुरू झाला.

- Advertisement -

दरम्यान, थायलंडमध्ये परवानाधारक बंदूक धारकांची संख्या अधिक आहे. इतर देशांच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. तसंच, याआधीही २०२० मध्ये असाच अंदाधूंद गोळीबार झाला होता. यावेळी एका सैनिकाने २९ लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -