घरदेश-विदेशदेशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतीदिन; जगातील ऐतिहासिक घटना

देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतीदिन; जगातील ऐतिहासिक घटना

Subscribe
मुंबई | भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने आजचा दिवस हा फार महत्वाचा मानला जातो.  १७ एप्रिल १९५२ रोजी भारतातील पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती. देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांचा आज स्मृतीदिन आहे. त्याच बरोबर आज जागतिक हिमोफिलिया दिन (World Hemophilia Day) म्हणून पाळला जातो.
हिमोफेलिया हा आनुवंशिक आजार आहे. या आजारात शरीरातील मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाढतो. जर एखाद्या व्यक्तीला जर हिमोफिलिया आजार झाला असेल तर त्या व्यक्तीला इजा झालेल्या भागात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. यामुळे इजा झालेला भागात सूज येते. परंतु, हा आजाराकडे दुर्लक्ष केले किंवा या आजाराविषय लोकांमध्ये जनजागृती नसल्याने ८० टक्के हिमोफेलिया या आजाराविषयी माहितीच नाही. राज्यात सध्या ३ हजारांहून अधिक हिमोफेलिया रुग्ण आहेत.
जगाच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना
भारताची पहिली लोकसभा अस्तित्वात आली
भारतात पहिली लोकसभा १९५१ सालच्या सार्वजनिक निवडणुकीनंतर आजच्या दिवशी म्हणजेच ७ एप्रिला १९५२ रोजी अस्तित्वात आली होती. १९५७ साली ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ती विसर्जित केली गेली. तर गणेश वासुदेव मावळणकर हे पहिले लोकसभा अध्यक्ष होते. गणेश मावळणकर हे पहिल्या तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले ते खासदार होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन
भारताचे पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज स्मृती दिन आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन हा भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी १९६२ ते १९६७ पर्यंत देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता. तर १९५२ ते १९६२ पर्यंत देशाचे पहिले उराराष्ट्रपती म्हणून काम केले. तसेच १९४९ ते १९५२ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  यांनी सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे दुसरे राजदूत म्हणून कार्यभार सांभाळला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना १९५४ मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तांना  १९३१ मध्ये नाइटहूड, १९६३ मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.
अमेरिकेतील थोर शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन
अमेरिकेतील थोर शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक आणि राजकारणी असे बहुगुणी व्यक्ती महत्त्व असलेले बेंजामिन फ्रँकलिन यांचा आज स्मृतीदिन आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचे आजच्या दिवशी १७९० साली निधन झाले. बेंजामिन फ्रँकलिन यांनी विजेच्या शक्तीविषयी महत्त्वाचा शोध लावला होता. तसेच बेंजामिन फ्रँकलिन यांनी त्यांच्या संसोधनासाठी कधीच पेटंट घेतले नाही. बेंजामिन फ्रँकलिन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचे लेखन करणाऱ्यापैकी एक महान व्यक्ती होते. त्याचबरोबर ब्रिटिशांपासून अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या करारावर स्वाक्षरी करणारे महत्वाचे व्यक्ती होते.
बेसबॉलचे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म
बेसबॉलचे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म आजच्या दिवशी १८२० रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झाला. अलेक्झांडर कार्टराईट यांनी १८४५ मध्ये आधुनिक बेसबॉलचा शोध लावला. न्यूयॉर्क निकेरबॉकर बेसबॉल क्लबच्या सदस्यांनी अलेक्झांडर कार्टराईट यांच्या आधुनिक बेसबॉल खेळाचा स्वीकार केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -