घरदेश-विदेशहाच तुमचा सनातन धर्म का? नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून उदयनिधींचा भाजपला सवाल

हाच तुमचा सनातन धर्म का? नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून उदयनिधींचा भाजपला सवाल

Subscribe

सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेले नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांना बोलावण्यात आले नाही. त्या विधवा आणि आदिवासी असल्यानेच त्यांना बोलवण्यात आलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेले द्रमूक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आले नाही. त्या विधवा आणि आदिवासी असल्यानेच त्यांना बोलवण्यात आलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

यापूर्वीही उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. अशातच आता पुन्हा एकदा उदयनिधी स्टॅनिल यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य केलं आहे. उदयनिधी स्ट‌ॅलिन यांनी सनातन धर्मावर एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. अशातच आता पुन्हा एकदा उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मााबाबत वक्तव्य केलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी मदुराई येथील एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवत राहू, असंही ते म्हणाले. सुमारे 800 कोटी रुपये खर्चून बांधलेलं नवं संसद भवन हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता, यावर उदयनिधी स्टॅनिल यांनी भर दिला. तरीही भारताच्या प्रथम नागरिक असूनही देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आलं नाही. त्यांच्या आदिवासी पार्श्वभूमीवर आणि त्या विधवा असल्यानं त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं होतं, असंही उदयनिधी म्हणाले आहेत.

- Advertisement -

हाच सनातन धर्म आहे का?

उदयनिधी म्हणाले की, संसदेच्या नव्या इमारीतचं उद्गघाटन करण्यात आलं आहे. त्यांनी (भाजप) उद्घघाटनासाठी तामिळनाडूतील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित केलं होतं. परंतु , भारताच्या राष्ट्रपतींना आमंत्रित करता आलं नाही, कारण त्या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातील आहेत. हा सनातन धर्म आहे का? राष्ट्रपदी द्रौपदी मूर्मू यांना संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, तसंच, आता विशेष अधिवेशनासाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही, असं ही उदयनिधी म्हणाले.

(हेही वाचा NIA कडून कॅनडाशी संबंधित 43 दहशतवादी आणि गँगस्टरचा तपशील जारी; लॉरेन्स बिश्नोईसह ‘यांचा’ही समावेश )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -