घरदेश-विदेशNIA कडून कॅनडाशी संबंधित 43 दहशतवादी आणि गँगस्टरचा तपशील जारी; लॉरेन्स बिश्नोईसह...

NIA कडून कॅनडाशी संबंधित 43 दहशतवादी आणि गँगस्टरचा तपशील जारी; लॉरेन्स बिश्नोईसह ‘यांचा’ही समावेश

Subscribe

राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी (NIA) कॅनडाशी संबंधित असणाऱ्या 43 दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी केला आहे. त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालमत्ता आणि संपत्तीबाबतही मोहिती लोकांनी NIA ला द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी (NIA) कॅनडाशी संबंधित असणाऱ्या 43 दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी केला आहे. त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालमत्ता आणि संपत्तीबाबतही मोहिती लोकांनी NIA ला द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे. (NIA releases details of 43 terrorists and gangsters linked to Canada Including Lawrence Bishnoi )

NIA ने जारी केलेल्या यादीत असणारे काही गँगस्टर हे आधीच जेलमध्ये आहेत तर काही फरार असून परदेशात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहेत. या यादीमध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्याप्रकरणातील सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई तसंच गोल्डी ब्रार यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

तपास यंत्रणा, आता 43 गुन्हेगारांच्या मालमत्तेची माहिती गोळा करत आहे, जेणेकरुन त्यांच्यावर पुढील कारवाई करता येईल आणि त्यामुळे या गँगस्टर्सविषयी काहीही माहिती असल्यास ती NIA ला देण्यात यावी, असं आवाहन NIA कडून करण्यात आलं आहे.

कॅनडामध्ये खालिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा सनसनाटी आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांन केल्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय पेच निर्माण झाला आहे. कॅनडाने केवळ आरोप न करता भारताच्या ओटावा वकिलातीमधील एक अधिकाऱ्याला रॉ चा स्थानिक प्रमुख असल्याचा आरोप करत मायदेशी पाठवले आहे. या घटनेमुळे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत.

- Advertisement -

या घडामोडीनंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने बुधवारी कॅनडाशी संबंध असणाऱ्या 43 दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी केला आहे. त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालमत्ता आणि संपत्तीबाबत माहिती लोकांनी एनआयएला द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. ही संपत्ती केंद्र सरकारकडून ताब्यात घेतली जाऊ शकते.

(हेही वाचा: विराट कोहलीसाठी देश सर्वोतोपरी; खलिस्तानी गायक टीम इंडियाच्या ब्लॅकलिस्टमध्ये )

एनआयएने केलेलं ट्वीट

NIA ने एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई, जसदीप सिंग, काला जथेरी उर्फ संदीप, वीरेंद्र प्रताप उर्फ काला राणा आणि जोगिंदर सिंग यांच्यासह इतरही सर्व गुन्हेगारांचा तपशील छायाचित्रांसह जारी केला आहे. यातील अनेक गुंड कॅनडात स्थायिक असल्याचं एनआयए च्या निवेदनात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -