घरताज्या घडामोडीLockdown: ३ मे पर्यंत रेल्वे सेवा बंदच; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Lockdown: ३ मे पर्यंत रेल्वे सेवा बंदच; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Subscribe

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सेवा कधी सुरु होणार आहे याबाबतच्या सुचना दिलेल्या नाहीत.

रेल्वे मंत्रालयाने ३ मे २०२० पर्यंत देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनपासून मध्य रेल्वेच्या १५५ उपनगरीय लोकल कारशेडमध्ये उभ्या आहेत. तर लांबपल्ल्याच्या २२२ रेल्वे गाडया या मुंबई, सोलापूर, पुणे, नागपूर या चार विभागात उभ्या आहेत. या गाड्या ३ मे पर्यंत सुरु होणार नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. असं असलं तरी रेल्वे सेवा कधी सुरु होणार आहे याबाबतच्या सुचना दिल्या गेलेल्या नाहीत. दरम्यान, लोकल जरी कारशेडमध्ये सुरक्षित असल्या तरी लांबपल्याच्या गाड्या मात्र ठिकठिकाणी उभ्या आहेत. त्या जिथे आहेत त्या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, या गाड्या ज्या ठिकाणी उभ्या आहेत या गाड्यांवर नजर ठेवली जात आहे. काही ठिकाणी सीसी टीव्ही तर जेथे ती सुविधा नाही तेथे रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. मात्र अनेक इंजिन सध्या सुरु असलेल्या मालगाड्यांची वाहतूकीसाठी टप्प्यांवर चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये कल्याण, मुलुंड, इगपुरी, लोणावळा या भागात देखिल इंजिन सेवा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रेड झोनमध्ये काटेकोर नियम पाळावेच लागतील – उद्धव ठाकरे


तथापि, ज्या ठिकाणी लांबपल्ल्याच्या गाड्या उभ्या आहेत, त्या गाड्यांमधील पंखे, स्वच्छतागृहांमधील नळ, वॉशबेसिन, डब्यांमधील पंखे, दिवे तसंच वातानुकूलीत डब्यांमधील अन्य सुविधा, आरसे आदींची चोरी होऊ नये यासाठी आरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -