घरदेश-विदेशcorona vaccine चा तुटवडा होणार दूर; Sputnik V लसींची दुसरी खेप शुक्रवारी...

corona vaccine चा तुटवडा होणार दूर; Sputnik V लसींची दुसरी खेप शुक्रवारी भारतात!

Subscribe

देशात कोरोनाचा उद्रेक सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाचा बाधितांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात लसीकरण मोहीम देखील वेगात सुरू आहे. मात्र कोरोना लसींचा तुटवडा भासत असल्याने या लसीकरण मोहीमेचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र लशींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. काही राज्यांनी तर १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण बंद केलं आहे. त्यामुळे लशींचा पुरवठा वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. अशा परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे रशियातून स्पुटनिक व्ही लसींची दुसरी खेप उद्या भारतात दाखल होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला वेग येईल, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

कोरोना लसींचा तुटवडा भासत असल्याने केंद्राने यासंदर्भात अनेक राज्यांशी चर्चा केली. दरम्यान, रशियातून स्पुटनिक व्ही लसींची दुसरी खेप उद्या भारतात पाठवण्यात येणार आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना यापूर्वी रशियाच्या स्पुटनिक- V लशीच्या दीड लाख डोसची पहिली बॅच भारतात हैदराबादमध्ये १ मे रोजी दाखल झााली होती. सध्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनका यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेली कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन या लसींसह रशियाची स्पुटनिक V या तीन लसी आता भारतीयांना मिळणार आहे. त्यामुळे कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी ही लस नक्कीच मदत करणार असल्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात स्पुटनिक व्ही लसींची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती. ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.

काही अहवालानुसार या लसीचं मार्केटिंग करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) या रशियन कंपनीने भारतात स्पुटनिक V लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस उत्पादित करण्याचा करार केला आहे. स्पुटनिक V लसीला भारतासह ६० देशांनी मंजुरी दिली आहे. RDIF कंपनीन भारतात या लसीच्या वितरणाससाठी डॉ. रेड्डीज लॅब आणि ग्लँड फार्मासह एकूण ५ कंपन्यांशी करार केला आहे. तर स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -