घरटेक-वेक'या' कंपनीने तयार केला भन्नाट फोन जो दाखवेल शरीराचे तापमान

‘या’ कंपनीने तयार केला भन्नाट फोन जो दाखवेल शरीराचे तापमान

Subscribe

फोन एकदा चार्ज केल्यानंतर ४ दिवस सुरु राहतो असा दावा कंपनीने केला आहे.

हल्ली सगळ्या गोष्टी फोनवर एका क्लिकवर कळत असतात. आता फोनवर शरीराचे तापमानही कळणार आहे. itel या भारतीय कंपनीने एक फोन लाँच केला आहे. ज्यात असे एक फिचर देण्यात आले आहे ज्यातून आपल्या शरीरातील तापमान देखिल कळण्यास मदत होणार आहे. itel it2192T Thermo Edition असे त्या फोनचे नाव आहे. या फोनमध्ये इनबिल्ड टेम्प्रेचर सेंसरचा वापर करण्यात आला आहे. हा फोन फ्रंटलाईन वर्करसाठी सर्वात जास्त उपयोगी पडेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

हा फोन इतर फोनपेक्षा कमी आकाराचा आहे. फोनमध्ये १.८ इंचाचा डिस्ले देण्यात आला आहे. फोनचा बॉटरी बॅकअप १०००mAh देण्यात आली आहे. फोनमध्ये ४GBरॅम देण्यात आला आहे. हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर ४ दिवस सुरु राहतो असा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर फोनला सुपर बॅकअप मोड देखिल देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये कॉलिंग,मेसेजिंग,FM रेडिओ,ऑटो कॉल रेकॉर्डिंग, एलईडी फ्लॉश लाईट चे पर्यायही देण्यात आले आहेत. या फोनची किंमत केवळ १ हजार ४९ रुपये इतकी आहे.

- Advertisement -

या फोनमध्ये तापमान मोजण्यासाठी थर्मो सेन्सॉर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फिंगर प्रिंट स्कॅनसाठी सेन्सॉरदेखिल देण्यात आला आहे. या फोनमध्ये शरीराचे तापमान सेल्सिअस आणि फॉरेन हाइटमध्ये मोजले जाऊ शकते. खास वैशिष्ट्य म्हणजे या फोन व्हॉइज टायपिंग कमांड देण्यात आली आहे. त्याचबरोबर युझर आठ भाषेत हा फोन वापरु शकतो. यात इंग्रजी, हिंदी,पंजाबी,तमिळ,तेलुगू,कन्नड आणि गुजराती भाषांच्या समावेश आहे.


हेही वाचा – तुम्हीही What’s Appमध्ये ‘या’ सेटिंग्स केल्या आहेत का? तर ठरु शकतात धोकादायक, आताच करा बदल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -