घरदेश-विदेशउत्तर अफगाणिस्तानमध्ये व्हॅन खोल दरीत पडली; आठ मुलांसह 24 जणांचा मृत्यू

उत्तर अफगाणिस्तानमध्ये व्हॅन खोल दरीत पडली; आठ मुलांसह 24 जणांचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये बुधवारी (7 जून) एक व्हॅन खड्ड्यात पडून मोठा भीषण अपघात घडला आहे. सार-ए-पोल प्रांताचे पोलीस प्रवक्ते दीन मोहम्मद नाझरी यांनी चालकाच्या निष्काळजीपणामुळे व्हॅन दरीत कोसळल्याचे पोलीस प्रवक्त्यांनी सांगितले. खोल दरीत पडून घडलेल्या अपघातामध्ये 8 लहान मुले आणि 12 महिलांसह 24 जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे व्हॅन रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळली, अशी माहिती दिली. (The van fell into a deep ravine in northern Afghanistan; 24 people died including eight children)

तालिबान सरकारमुळे रस्त्यांची अवस्था बिकट
पोलीस प्रवक्त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघात होत असतात. तालिबान सरकार आल्यानंतर रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून रस्ते व वाहतुकीची अत्यावश्यक कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे तालिबानच्या निष्काळजीपणाची किंमत रस्ते अपघातात सर्वसामान्यांना जीव देऊन चुकवावी लागत आहे. खामा प्रेसच्या अलीकडील अहवालानुसार, अफगाणिस्तानमध्ये लघमान प्रांतात आणखी दोन अपघात झाले आहेत. या दोन वेगळ्या रस्ते अपघातात दोन जण ठार झाले असून 20 जण जखमी झाले.

- Advertisement -

आठवडाभरात अनेक अपघात
प्रांतीय वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरात या ठिकाणी असे अनेक अपघात होत असतात. रस्त्याच्या खराब पायाभूत सुविधांमुळे तीन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी, काबूल-नांगरहार महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाला मिनीबसची धडक बसल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. याशिवाय अफगाणिस्तानच्या वर्दक प्रांतात अशाच आणखी एका रस्ते अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून आठ जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये यापुढेही रस्ते अपघात वाढण्याची शक्यता आहे.  मुख्य कारणे धोकादायक आणि बेपर्वा वाहन चालवणे, खराब झालेले रस्ते आणि देखभाल न केलेल्या वाहनांना आवर घालण्यात अपयशी येत आहे. या गोष्टींशी काबूलसह देशाचे वाहतूक पोलीस सहमत आहेत, अशी माहिती प्रांतीय वाहतूक पोलिसांनी दिली.

बॉम्बस्फोटात तालिबानी डेप्युटी गव्हर्नर ठार

दरम्यान, तालिबानचे बदख्शान प्रांताचे कार्यवाहक डेप्युटी गव्हर्नर मौलवी निसार अहमद अहमदी प्रांतीय राजधानी फैजाबाद येथे मंगळवारी (6 जून) कार बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. तालिबान शासित बदख्शानच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख मौजुद्दीन अहमदी यांनी दिलेल्या माहितीनुसार फैजाबादच्या महाकमा प्लाझा येथे हल्लेखोरांनी बदख्शानचे नायब आणि कार्यवाहक मंत्री मौलवी अहमद अहमदी यांच्या वाहनासमोर स्फोट केला. यात नायब राज्यपालांसह त्यांचा वाहनचालक ठार झाला. या बॉम्बस्फोटात आजूबाजूचे काही लोकही जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -