घरदेश-विदेशGaganyaan Mission : पहिली 'गगनयान' मोहीम ऑगस्ट अखेरीस, इस्रोने दिली माहिती

Gaganyaan Mission : पहिली ‘गगनयान’ मोहीम ऑगस्ट अखेरीस, इस्रोने दिली माहिती

Subscribe

नवी दिल्ली : भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’ (Gaganyaan Mission) ऑगस्टच्या अखेरीस लॉन्च करण्यात येईल, तर मानवविरहित मोहीम पुढील वर्षी प्रक्षेपित केली जाईल, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.

फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) येथे झालेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी सोमनाथ यांनी ही माहिती दिली. गगनयान मोहिमेसाठी आम्ही एक नवीन रॉकेट तयार केले आहे, जे श्रीहरिकोटा येथे सज्ज आहे. क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टमच्या एकत्रीकरणावर काम सुरू झाले आहे. या महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण होईल आणि सर्व चाचण्या केल्या जातील, असे मला सांगण्यात आले असल्याची माहिती एस. सोमनाथ यांनी दिली.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 साली स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात 10,000 कोटी रुपयांच्या गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत 2022मध्ये ही पहिली मानवी अंतराळ मोहीम सुरू करण्याची योजना सरकारने आखली होती, परंतु कोविड-19 महामारीमुळे ते वास्तवात येऊ शकले नाही. पण आता ती निश्चित झाली आहे. त्याची अधिक माहिती देताना एस. सोमनाथ म्हणाले, प्रकल्पाचा एक भाग म्हणून ‘मानवविरहित मोहीम’ पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे. 2024च्या सुरुवातीस, आमच्याकडे एक मानवविरहित मिशन असेल आणि नंतर ते सुरक्षितपणे परत आणण्याचे तिसरे मिशन असेल. सध्या आम्ही या तीन मोहिमा निश्चित केल्या आहेत.

- Advertisement -

परम विक्रम-1000चे लाँचिंग
सोमनाथ यांनी PRL येथे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग (HPC) सुपर कॉम्प्युटर ‘परम विक्रम-1000’ लाँच केले. सध्या वापरल्या जाणाऱ्या विक्रम-100पेक्षा ते 10 पट वेगवान आहे. आता पीआरएल शास्त्रज्ञांकडे संशोधन कार्यासाठी त्यांचे मॉडेल आणि संगणक सिम्युलेशन चालवण्याची क्षमता अधिक आहे, असे सोमनाथ म्हणाले. गगनयानच्या क्रू मेंबर्सची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी आम्ही दोन गोष्टींवर भर देत आहोत. पहिली क्रू एस्केप सिस्टम आणि दुसरी एकात्मिक वाहन आरोग्य व्यवस्थापन प्रणाली, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -