घरदेश-विदेशमतदान करा; अन्यथा दंड भरा!

मतदान करा; अन्यथा दंड भरा!

Subscribe

गुजरातमधील एका गावात मतदान न केल्यास चक्क ५१ रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

सर्वांनी राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी मतदान करायला हवं. मात्र हा हक्क मतदारावर लादता येत नाही. मात्र, असे असताना देखील गुजरातमधील एका गावात मतदान न केल्यास दंड आकारला जाणार आहे. गुजरातमधील राजसमाधीयाला या नावाचे गाव असून या गावात कोणत्याही निवडणुकीत मतदान न केल्यास मतदाराला चक्क ५१ रुपयांचा दंड आकारण्यात येतो. तर राजकीय पक्षांच्या प्रचारालाही या गावामध्ये बंदी घालण्यात आली आहे. याबद्दल दोन्ही पक्षांना निम्मी निम्मी मते घालण्याची शक्कल या गावकऱ्यांनी शोधली आहे.

- Advertisement -

५१ रुपयांचा आकारण्यात येणार दंड

गुजरातमध्ये राजसमाधीयाला या गावामध्ये निवडणुकीत मतदान न केल्यास मतदाराला चक्क ५१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या गावात मतदानही सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच दोन पक्षांचे उमेदवार जर निवडणुकीला उभे असतील तर गावातील एकूण मतांपैकी निम्मी मते एकाला तर निम्मी मते दुसऱ्या उमेदवाराला घालण्यात येतात. विशेष म्हणजे या गावाने आपली एक आदर्श नियमावलीच जारी केली आहे. जातीयवादाला या गावात थारा नाही. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी रिकामे बसायचे नाही. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, अशा काही नियमांबरोबरच काही चुका केल्यास दंडही आकारण्यात येतो. यापैकीच एक म्हणजे मतदान न केल्यास ५१ रुपयांचा दंड. दंडाची रक्कम ५१ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे.

- Advertisement -
  • उघड्यावर, गावात कचरा टाकल्यास ५१ रुपयांचा दंड
  • प्लॅस्टिक पिशव्या फेकल्यास ५१ रुपयांचा दंड
  • गुटखा खाल्ल्यास ५१ रुपयांचा दंड
  • मद्यप्राशन ५०० रुपयांचा दंड
  • खोटा साक्षीदार बनल्यास २५१ रुपये दंड
  • ग्राम पंचायतीचा कर थकवल्यास, अतिक्रमण केल्यास, सार्वजनिक ठिकाणी एखाद्यावर टीका केल्यास २५१ रुपयांचा दंड
  •  झाडांना हानी किंवा तोडल्यास ५०० रुपयांचा दंड
  • लोक अदालतीला न विचारता पोलिसांत किंवा न्यायालयात गेल्यास ५०० रुपयांचा दंड
  • फटाक्यांचा वापर किंवा अंधश्रद्धा बाळगल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

यामुळे प्रचारावर घालण्यात आली बंदी

या गावात कमालीची स्वच्छता केली जाते. हरदेव सिंह जडेजा हे जेव्हा सरपंच झाले होते, तेव्हापासून या गावामध्ये निवडणुकांचा प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचे कारण गावकऱ्यांनी असे सांगितले की, प्रचारामुळे प्रदुषण होते.


वाचा – काँग्रेसने हिंदूंवर दहशतवाद लादला

वाचा – यंदा मतदानाचा टक्का घसरला; पाहा २०१४ आणि २०१९ ची आकडेवारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -