घरमहाराष्ट्रमनमाड : फ्लोवर मिलला भीषण आग

मनमाड : फ्लोवर मिलला भीषण आग

Subscribe

मनमाड-नांदगांव मार्गावरील बुरकुलवाडी परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतील फ्लोवर मिलला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

मनमाड-नांदगांव मार्गावरील बुरकुलवाडी परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका फ्लोवर मिलला सकाळी भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. मिलच्या आतमध्ये धान्य आणि बारदानच्या गोण्या असल्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण इमारतीत आगीचे लोण दिसू लागले आहेत. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आगीचे कारण अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमध्ये फ्लोवर मिल जळून खाक झाली आहे.

नेमके काय घडले?

मनमाडपासून जवळ नांदगांव मार्गावर बुरकुलवाडी परिसरात औद्योगिक वसाहत असून त्यात अजित बेदमुथा यांचे फ्लोवर मिल असून त्या मिलला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली. आपल्या मिलला आग लागल्याचे कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो प्रयत्न आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आग इतकी भीषण होती की तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक बंब अपुरे पडत होते. मनमाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडे ३ बंब असून त्यापैकी एक बंब हा आज नांदगावला होणाऱ्या शरद पवार यांच्या सभास्थळी तर दुसरा बंब हा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे होणाऱ्या सभेच्या ठिकाणी गेलेला आहे. त्यामुळे शहरात एकच बंब उरला होता. हा बंब घटनास्थळी गेला मात्र आग मोठी असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तो कमी पडत होता. त्यामुळे आग वाढत गेली आणि त्यात फ्लोवर मिल जळून खाक झाली. विशेष म्हणजे आज रविवार असल्याने मजुरांना सुट्टी होती त्यामुळे जिवीतहानी टळळी आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -