घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमधील माछिलमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्थान

जम्मू काश्मीरमधील माछिलमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्थान

Subscribe

जम्मू काश्मीरच्या माछिल भागामध्ये बुधवारी नियंत्रणरेषेजवळ भारतीय सैन्यानं ३ दहशतवादींना कंठस्थान घालून घुसखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. माछिलच्या नियंत्रण रेषेजवळ सैन्याला संशयित हालचाली जाणवल्यानंतर त्यांनी दहशतवादींविरुद्ध हल्ला चढवला. या हल्ल्यामध्येच तीन दहशवतवाद्यांना ठार करण्यात सैन्याला यश मिळाले. अजूनही इतर कोणी या भागात सापडण्याची शक्यता आहे का? याचा तपास सैन्य घेत आहे.

काही तासांपूर्वीच केला होता हरवानमध्ये स्फोट

या घटनेच्या काही तासांपूर्वीच दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीर क्षेत्रातील हरवानमध्ये सैन्याच्या गाडीवर निशाणा साधून आयईडी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात गाडीचं नुकसान झालं होतं. मात्र, कोणत्याही सैनिकाला इजा झाली नव्हती. ही घटना सोपोरपासून २० किलोमीटरवर असलेल्या हरवान यंबरजाल या ठिकाणी घडली. या घटनेची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद संघटनेनं स्वीकारली आहे.

- Advertisement -

मंगळवारीदेखील सैन्यावर दहशतवादींनी केला होता हमला

एएनआयच्या माहितीनुसार, मंगळवारीदेखील दहशतवादींनी हल्ला केला होता. या हल्ल्यात चार ते सहा दहशतवाद्यांनी सैन्यावर दोन्ही बाजूनं हमला केला आणि साधारणतः ८ राऊंड फायरिंग केली. पोलीस आणि सैन्यावर ग्रेनेड लाँचिंगचा वापर करण्यात आला. सैन्याचं जास्त नुकसान झालं नसून या संपूर्ण क्षेत्रामध्ये सध्या दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरु आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -