घरदेश-विदेशट्रम्प-किमच्या भेटीला 'गुरखा'चे संरक्षण

ट्रम्प-किमच्या भेटीला ‘गुरखा’चे संरक्षण

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांची भेट तेत्या १२ जून रोजी सिंगापुरमध्ये होणार आहे. ही एक ऐतिहासिक भेटी मानली जात आहे. त्यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दोन हुकूमशहांच्या भेटीची चर्चा देशपातळीवर होत असतानाच त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भातही महत्त्वाची पाऊले उचलली जात आहेत. सिंगापुर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा ट्रम्प आणि किम यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार असून यावेळी गुरखा जवानही महत्त्वाची कामगिरी बजावणार आहेत. या भेटीदरम्यान दोघांच्या सुरक्षेसाठी गुरखा जवान तैनात राहणार आहेत.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

महत्त्वाच्या प्रसंगी दिली जाते जबाबदारी

ट्रम्प आणि किम जोंग हे दोघेही सिंगापुर दौऱ्यावर आपाआपल्या खासगी सुरक्षारक्षकांना घेऊन येणार आहेत. तर सिंगापुरच्या पोलिसांसह गुरखा जवानांचा समावेश असणार आहे. हे जवान दोघांच्या बैठकीची जागा, त्यांच्या मार्गातील रस्ते आणि हॉटेलची सुरक्षा यावर नजर ठेवणार आहेत. सिंगापुरमध्ये गुरखा जवानांची संख्या कमी आहे. मात्र ठराविक प्रसंगी गुरखाच्या सुरक्षा रक्षक तुकडीला संरक्षणाची जबाबदारी दिली जाते. नुकतेच शांगरी-ला हॉटेलमध्ये सुरक्षा मुद्दयावर झालेल्या संमेलनात गुरखा जवान तैनात करण्यात आले होते. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिससह इतर देशातील नेते उपस्थित होते.

सिंगापुर प्रशासन सर्वाधिक चांगले गुरखा रक्षक या भेटीदरम्यान तैनात करतील. हे रक्षक महत्त्वाचे आणि पुढे उभे राहणारे सुरक्षा रक्षक आहेत. अशा विशेष कार्यक्रमांसाठी त्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. सिंगापुर पोलिसांच्य वेबसाइटवर त्यांना ‘सक्षम, सजग आणि सुदृढ’ म्हटले आहे.
– हक्सली, सिंगापुर सुरक्षा दलाचे तज्ज्ञ

- Advertisement -

खुखरी आणि गुरखा

नेपाळच्या पहाडी परिसरातील गुरखांना सिंगापुरच्या पोलिसात भरती करण्यात आले आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे अत्याधुनिक शस्त्र असतात. मात्र त्यांचे मुख्य हत्यार खुखरी मानलं जातं. हे त्यांचे पारंपरिक आणि आवडते शस्त्र आहे. असं म्हणतात की जेव्हा खुखरी काढली जाते तेव्हा त्याला रक्त लागल्याशिवाय ती ठेवली जात नाही.

  • सिंगापुर पोलीस दलात एकूण १८०० गुरखा जवान तैनात
  • जे सिंगापुरच्या सहा अर्धसैनिक कंपन्यांचा भाग आहेत
  • गुरखा जवान सिंगापुरच्या माउंट वेरनॉन कॅम्पमध्ये आपल्या कुटूंबियांसोबत राहतात
  • या परिसरात सामान्य नागरिकांच्या प्रवेशाला बंदी आहे
  • येथे गुरखांवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत
  • त्यांची मुलं स्थानीक शाळांमध्ये शिकतात
  • गुरखांना सिंगापुरच्या स्थानिक महिलांसोबत लग्न करण्याची परवानगी नाही
  • वयाच्या १८ ते १९ व्या वर्षी यांना गुरखा सुरक्षा जवानाचे प्रशिक्षण दिले जाते
  • सिंगापुर पोलिसात भरती झालेल्यांचे ४५ वर्ष सेवानिवृत्तीचे वय असते
Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -