घरदेश-विदेशए हालो! विमानतळावर गरबा, Video व्हायरल

ए हालो! विमानतळावर गरबा, Video व्हायरल

Subscribe

प्रवाशांसह चक्क एअरपोर्टवरील एअर होस्टेस आणि वैमानिक यांनीही गरब्याचा ताल धरला

गुरुवारी (काल) देशभरात मोठ्या उत्साहात दसऱ्याचा उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या ९ दिवसांपासून सर्वत्र गरब्याचा आणि दांडियाचा उत्साह पाहायला मिळाला. लोक उत्साहात जल्लोषात गरबा खेळतानाचे अनेक व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. सहसा आपण मैदानावर, सोसायटीच्या आवारामध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये गरबा खेळतो. मात्र, काही गरबा प्रेमींनी चक्क विमानतळावरच गरब्याचा फेर धरला. हा धमाल प्रकार घडला अहमदाबाद विमानतळावर. अहमदाबाद विमानतळावर काही प्रवाशांनी एकत्र येत चक्क गरब्याचा फेर धरला. विशेष म्हणजे प्रवाशांचा या धमाल गरबा नृत्यात काही एअर होस्टेस आणि पायलटनीही सहभाग घेतला होता. विमानतळ जिथे अन्य ठिकाणच्या तुलनेत सुरक्षेचे नियम अधिक कडक असतात, चक्क अशाठिकाणी गरबा खेळल्यााचा हा व्हिडिओ, सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तुम्हीही पाहा याची एक झलक :


वाचा: लोहगाव विमानतळाचा विस्तार लवकरच…
वाचा: तीन वर्षांनंतर नवी मुंबई विमानतळाहून उड्डाण शक्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -